Sara Tendulkar : "ती मी नव्हेच!" डिपफेक अन् फेक अकाउंटमुळे वैतागली सारा, इंस्टा स्टोरी द्वारे X कडे केली ही विनंती...

Sara Tendulkar Takes Stand Against Fake Accounts And Deepfakes
Sara Tendulkar Takes Stand Against Fake Accounts And Deepfakes

Sara Tendulkar Takes Stand Against Fake Accounts And Deepfakes : महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नुकतीच डीपफेकची शिकार झाली. गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक घटना सोशल मीडियावर समोर आल्या आहेत. लोक सेलिब्रिटीच्या फोटो किंवा व्हिडिओशी छेडछाड करतात आणि सोशल मीडियावर अपलोड करतात.

दरम्यान भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलसोबत त्याचा फोटो शेअर करण्यात आला होता. याबाबत साराने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

Sara Tendulkar Takes Stand Against Fake Accounts And Deepfakes
Mohammed Shami : 'संपूर्ण टीम हॉटेलला जायची, मी मात्र हॉस्पिटलमध्ये जाऊन...' वर्ल्ड कपनंतर शमीचा धक्कादायक खुलासा

साराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “सोशल मीडिया हे आपल्या सर्वांसाठी आनंद, दु:ख आणि दैनंदिन जीवनात काही चांगल्या गोष्टी शेअर करण्यासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. मात्र, तंत्रज्ञानाचा गैरवापर पाहणे चिंताजनक आहे.

सारा तेंडुलकर म्हणाली की, तिचे X (ट्विटर) वर खाते नाही पण कोणीतरी तिचे नाव वापरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून X वर साराच्या नावाने एक अकाऊंट सक्रिय आहे आणि त्यावर साराच्या आयुष्याशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती शेअर केली जात आहे.

सारा म्हणाली की, “X वर @SaraTendulkar_ नावाचे एक विडंबन खाते आहे. पण ते मला चुकीचे दाखविण्याचा प्रयत्न करत आहे आणि दिशाभूल करण्याच्या उद्देशाने बनवले आहे. माझे X वर खाते नाही. मला आशा आहे की ते याकडे लक्ष देतील. आणि हे खाते डिलीट करतील. मात्र, नंतर तिने ही इन्स्टा स्टोरी डिलीट केली.

काही महिन्यापुर्वी शुभमन गिलसोबत साराचा एक बनावट फोटो व्हायरल झाला होता. सारा आणि अर्जुन तेंडुलकरच्या फोटोशी छेडछाड करण्यात आली होती. अर्जुनच्या जागी शुभमनचा फोटो लावला होता. साराच्या आधी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि कतरिना कैफ या डीपफेकच्या शिकार झाल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com