Virat Kohli
Virat KohliSakal

Miss U Kohli... स्टेडियममध्ये तरुणीनं दाखवलं 'विराट'प्रेम

Published on

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत भारतीय संघाला विराटची उणीव भासली नसली तरी चाहत्यांना मात्र ती जाणवली. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) धमाकेदार विजय साजरा केला. या विजयाची चर्चा रंगत असताना सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. यात एक विराट कोहली (Virat Kohli) याची एक चाहती त्याला मिस करताना पाहायला मिळाले. धर्मशाला स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या एका तरुणीने फलकबाजीच्या माध्यमातून किंग कोहलीवरील 'विराट' प्रेम दाखवून दिले.

सामन्यादरम्यान एक तरुणी पोस्टरवर दाखवताना कॅरेऱ्यात कैद झाली. या पोस्टरवर मिस यू कोहली असं लिहिलं होते. तिच्या अवतीभोवतीचे लोकही तिला या गोष्टीसाठी प्रोत्साहन देताना दिसले. यातून किंग कोहली मैदानात नसला तरी स्टेडियमवर त्याची जादू आहे, हेच दिसून आले.

Virat Kohli
IND vs SL : अय्यरसह टीम इंडियाची हॅटट्रिक; लंकेलाही चारली धूळ!

विराट कोहलीने वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मालिकेनंतर विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तो वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या आणि श्रीलंकेविरुद्धच्या संपूर्ण मालिकेसाठी उपलब्ध नव्हता. त्याच्याशिवाय रिषभ पंत आणि शार्दुल ठाकूर यालाही मालिकेतून आराम देण्यात आला होता. टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या सामन्यातून विराट कोहली कमबॅक करणार आहे.

Virat Kohli
VIDEO : शनाकाची सलग दुसऱ्या सामन्यात तुफान फटकेबाजी; पण...

कोहलीसाठी मोहालीतील सामना खासच

भारतीय संघ 4 मार्च पासून मोहालीच्या मैदानात श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना विराट कोहलीसाठी खास असाच आहे. तो शंभरावा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सामना प्रेक्षकांशिवाय रंगणार आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात जी झलक पाहायला मिळाली ती या सामनायात पाहायला मिळणार नाही. त्याच्या चाहत्यांना टेलिव्हिजवरच या शंभरीचा आनंद घ्यावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com