अवघ्या ५ वर्षाच्या मुलाकडून पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू क्लिन बोल्ड VIDEO

बापलेकाचा हा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
sarfaraz ahmed former pakistan captain
sarfaraz ahmed former pakistan captain

पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमदचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. व्हिडिओ मध्ये 5 वर्षांचा मुलगा अब्दुल्लाने वडील सरफराजला क्लीन बोल्ड केले आहे. क्रिकेट चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. ज्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सरफराज त्याचा ५ वर्षाचा मुलगा अब्दुल्ला सरफराजला क्रिकेटचे धडे देताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सरफराज अहमद फलंदाजी करत आहे तर त्याचा मुलगा गोलंदाजी करत आहे. दरम्यान, अब्दुल्लाने त्याच्या वडिलांना आपल्या यॉर्करवर बाद केले. बापलेकाचा हा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. आपल्या मुलाने आपल्याला आऊट केल्यानंतर तो आनंदी झाल्याचे दिसत आहे.

एकीकडे सरफराजला क्रिकेटमध्ये खूप रस आहे, तर दुसरीकडे त्याचे वडील सरफराजला त्याने क्रिकेटर बनू नये असे वाटते. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत याविषयी सरफराजने भाष्य केलं होतं. माझ्या मुलानेही क्रिकेटर व्हावे असे मला वाटत नाही. एक क्रिकेटर म्हणून मी ज्या गोष्टींचा सामना केला आहे, त्याचा माझ्या मुलाला त्रास होऊ नये असे मला वाटते.

तसेच, क्रिकेटपटू म्हणून मला वाटतं की माझ्या भावाला किंवा मुलाला राष्ट्रीय संघात स्थान मिळायला हवं, असं झालं नाही तर मन दुखावलं जात. अशी भावना त्याने यावेळी व्यक्त केली होती. सरफराजने बांगलादेश दौऱ्यावर पाकिस्तानसाठी शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय आणि एप्रिल 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com