सदा खुश रहो तुम... मसूदच्या लग्नात सिंगर सर्फराज! VIDEO व्हायरल | Sarfaraz Ahmed Singing | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sarfaraz Ahmed Singing Video

Sarfaraz Ahmed Singing : सदा खुश रहो तुम... मसूदच्या लग्नात सिंगर सर्फराज! VIDEO व्हायरल

Sarfaraz Ahmed Singing Video : पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमदने नुकतेच कसोटी क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले. त्याने न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत एक शतक आणि तीन अर्धशतके ठोकली. मात्र आता तो एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कायम गंभीर चेहऱ्याने मैदानावर वावरणारा सर्फराज अहमद भलताच रंगात आलेला दिसतोय.

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शान मसूद नुकताच विवाहबद्ध झाला. शान मसूदच्या विवाहात सर्फराज अहमद देखील उपस्थित होता. सर्फराजने या लग्नाला फक्त उपस्थिती दर्शवली नाही तर बॉलीवूडमधील एक गाणे देखील म्हटले. सर्फराज अहमदने 'सदा खुश रहो तुम, ये दुआ हैं हमारी' हे गाणे म्हटले. त्यावर शान मसूदने देखील सर्फराज अहमदला खास दाद दिली. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सर्फराज अहमदने 2023 ची दमदार सुरूवात केली आहे. हा महिना सर्फराजसाठी जबरदस्त गेला. अनुभवी विकेटकिपर फलंदाज गेली चार वर्षे पाकिस्तानकडून खेळला नव्हता. मात्र संधी मिळताच त्याने न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेत पाकिस्तानची लाज वाचवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. सर्फराजने आपले चौथे कसोटी शतक ठोकले होते. त्यानंतर त्याने दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकत सामना वाचवला होता. सर्फराजने चार डावात 335 धावा केल्या. सर्फराज अहदमला त्याच्या झुंजार खेळीमुळे मालिकावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला.

(Sports Latest News)