
सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पदक निश्चित केले.
गतवर्षीच्या ऑलिंपिक पराभवाची परतफेड करताना त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
चिरागने या विजयाबद्दल समाधान व्यक्त केले.
भारताची दुहेरीतील सुपरस्टार जोडी सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील पदक निश्चित केले. किमान ब्राँझपदक पक्के करताना त्यांनी नेहमीच अडथळा ठरणाऱ्या दोन वेळच्या ऑलिंपिक पदकविजेत्या मलेशियाच्या ॲरन चिया आणि सो वुई यिक यांचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला.
गतवर्षीय याच पॅरिसमध्ये मलेशियाच्या याच जोडीविरुद्ध पराभव झाल्यामुळे सात्विक-चिराग यांचे ऑलिंपिक पदक हुकले होते. त्या पराभवाची परतफेड करताना आता विश्व अजिंक्यपदाचे पदक निश्चित केले.