ISSF World Cup: सौरभ चौधरी-मनू भाकर जोडीची 'चंदेरी' कामगिरी

त्यामुळे भारतीय जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
manu bhaker and saurabh chaudhary
manu bhaker and saurabh chaudharyTwitter

ISSF World Cup: क्रोएशियात सुरु असलेल्या ISSF वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी छाप सोडलीये. सौरभ चौधरी आणि मनू भाकर या जोडीने स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात त्यांनी भारताला पदकाची कमाई करुन दिली. सुवर्ण पदकाच्या लढतीत भारतीय जोडीसमोर रशियाच्या विटालिना बातसाराशकिना आणि आर्टेम चेरनोयूसोव यांचे आव्हान होते. या जोडीने अधिक गुणांची कमाई करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. त्यामुळे भारतीय जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

अभिषेक आणि यशस्वीनी ही भारतीय जोडी देखील पदकाच्या शर्यतीत होती. याच प्रकारात त्यांनी पात्रता फेरीत 386 गुणासह तिसरे स्थान मिळवले. कांस्य पदकासाठी त्यांच्यांसमोर इराणच्या गोलनौश सेबघाटोलाही आणि जावाद फोरोघी जोडीचे आव्हान होते. पण त्यांच्या पदरी निराशा आली. अभिषेक वर्मा आणि यशस्विनी सिंह देसवाल यांना कास्य पदकाने हुलकावणी दिली. या जोडीला कांस्य पदकाच्या लढतीत 17-7 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.

manu bhaker and saurabh chaudhary
World Cup : राही-मनू-यशस्विनीनं भारताला मिळवून दिलं कांस्य

रायफल प्रकारात नेमबाजांकडून निराशा

10 मीटर मिश्र एअर रायफल प्रकारात भारतीय टीमच्या पदरी निराशा आली. दोन्ही संघ फायनलमध्ये पात्र ठरले नाहीत. इलावेनिल वलारिवान आणि दिव्यांश सिंह पंवार जोडी दुसऱ्या क्वालिफायर राउंडपर्यंत पोहचली होती. 416.1 गुणासह त्यांना सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. अंजुम मोदगिल आणि दीपक कुमार पहिल्या क्वालिफायमध्ये बाहेर पडले. ते 15 व्या स्थानावर राहिले.

manu bhaker and saurabh chaudhary
सचिन झाला किवी गोलंदाजाच्या फलंदाजीवरही 'फिदा'

सौरभने स्पर्धेच्या पहिल्या दिवशी जिंकले होते पदक

मनू भाकरसोबत मिळवलेल्या रौप्य पदकापूर्वी सौरभने स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताला पदक मिळवून दिले होते. सौरभ चौधरीने पुरुष 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली होती. याच्याशिवाय मनू हिने यशस्विनी आणि राही सरनोबतच्या साथीने महिला गटातील पिस्टल प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली होती. ऑलिम्पिकपूर्वी भारतीयांसाठी ही शेवटची स्पर्धा आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com