Saurabh Walkar : रोहितचं टेन्शन वाढवणार सौरभ वालकर! वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड घेणार मराठमोळ्या अ‍ॅनलिस्टची मदत

Saurabh Walkar Performance Analyst
Saurabh Walkar Performance Analystesakal

Saurabh Walkar Performance Analyst : मुंबई रणजी ट्रॉफी विजेत्या संघाचा परफॉर्मन्स अ‍ॅनलिस्ट सौरभ वालकरला न्यूझीलंडने वनडे वर्ल्डकप 2023 साठी करारबद्ध केलं आहे. वालकरचा किवींसोबतचा पहिला दौरा हा 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. न्यूझीलंड इंग्लंडविरूद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. (ICC ODI World Cup 2023)

यंदाचा वनडे वर्ल्डकप हा भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या वर्ल्डकपसाठी टॉम लॅथमच्या नेतृत्वातील किवींच्या संघाला फिरकी खेळपट्टीसाठी तयार करण्याची जबाबदारी सौरभ वालकरवर असणार आहे. वालकर हा सध्या द हंड्रेड स्पर्धेत जॉस बटलरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मँचेस्टर ओरिजनल्ससाठी काम करत आहे.

Saurabh Walkar Performance Analyst
Gukesh D Chess Player : अवघ्या 17 वर्षाच्या गुकेशने विश्वनाथान आनंदलाही टाकलं मागं

माजी मुंबईकर सौरभ वालकर हा न्यूझीलंड संघासोबत काम करण्यासाठी आणि त्यांना वर्ल्डकपसाठी तयार करण्यासाठी उत्सुक आहे. वालकरने मिडे डेशी बोलताना म्हणाला की, 'भारतीय खेळपट्ट्यांची विशेष भुमिका असते. तुम्ही रणनिती आखताना भारतातील खेळपट्ट्या खूप महत्वाच्या असतात. न्यूझीलंड संघाचा भाग होणे ही माझ्यासाठी एक मोठी संधी आहे.'

वालकर पुढे म्हणाला की, 'सर्व संघाविरूद्ध विशेषकरून भारताविरूद्धची तयारी मी आधीच सुरू केली आहे. न्यूझीलंड माझ्याकडून भारतीय खेळाडूंविषयी विशेष माहिती द्यावी अशी अपेक्षा करत आहे.' (New Zealand Cricket Team)

'मी मुंबई वरिष्ठ संघाचा सदस्य असताना रोहित, सूर्या, शार्दुल आणि इतर खेळाडूंसोबत काम केलं आहे. मी स्वतःला मोठ्या स्पर्धेसाठी तयार करत आहे. याचबरोबर न्यूझीलंडचे मुख्य कोच गॅरी स्टेड यांना सहाय्य करण्यासाठी देखील मी तयारी करत आहे.'

Saurabh Walkar Performance Analyst
Asia Cup 2023 : आशिया कपपूर्वी भारतीय संघाला मिळाली एक चांगली बातमी मात्र...

सौरभला आहे दांडगा अनुभव

परफॉर्मन्स अ‍ॅनलिस्ट म्हणून सौरभ वालकरला चांगला अनुभव आहे. तो 38 वर्षांचा आहे त्याने मुंबई संघासोबत 8 वर्षे काम केलं आहे. तो एक इंजिनियर ग्रॅज्युएट आहे. सौरभवने 2006 मध्ये शिक्षण सोडलं. त्यानंतर त्याने चेन्नईतून एका वर्षाचा बायो मॅकेनिक्सचा कोर्स केला.

त्यानंतर त्याला 2007 मध्ये मुंबई संघात व्यंकटेश गुरूमूर्ती यांचा सहाय्यक परफॉर्मन्स अ‍ॅनलिस्ट म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सौरभने मुंबईबरोबरच राजस्थान रॉयल्स आणि 2021 च्या वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तान संघासोबत काम केलं आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com