Saurav Ganguly:'मला वाटत नाही भारत...'विश्वचषकाबाबत सौरव गांगुलीचं भाकीत

संपूर्ण देश भारताकडून विश्वचषकाची अपेक्षा करत आहे. मात्र, भारतीय संघाचे सध्याचे प्रदर्शन पाहता अनेक क्रिकेट विश्लेषकांकडून संघाच्या प्रदर्शनाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती.
saurav ganguly
saurav ganguly

ICC ODI World Cup:२०२३च्या एकदिवसीय विश्वचषकाला लवकरचं सुरुवात होणार आहे. यंदा विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. संपूर्ण देश भारताकडून विश्वचषकाची अपेक्षा करत आहे. मात्र, भारतीय संघाचे सध्याचे प्रदर्शन पाहता अनेक क्रिकेट विश्लेषकांकडून संघाच्या प्रदर्शनाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती.

अशातचं, भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतीय संघावर विश्वास दाखवलाय. विश्वचषक जिंकण्याच्या शर्यतीत भारत नेहमी असतो, असे गांगुली म्हणाले.

सौरव गांगुली म्हणाले की, "एकदिवसीय विश्वचषक सुरु होण्यात अगदी काही काळ शिल्लक राहिलाय."

यावेळी भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाले की, "मला नाही वाटतं भारत कोणत्याही एका संघावर फोकस करेल. ते प्रत्येक सामना योग्यरित्या खेळण्याचा प्रयत्न करुन फायनलपर्यंत प्रवास करतील. विश्वचषक जिंकण्याची भारतीय संघाला नेहमी संधी असते."

saurav ganguly
Pune News : भुजबळांविरोधात व्यक्तव्य करणाऱ्या देशपांडेला अटक करा; समता परिषदेची मागणी

भारताने शेवटची आयसीसी स्पर्धा २०१३मध्ये जिंकली होती, तेव्हापासून भारताकडे आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ आहे. त्यानंतर भारताने अनेक वेळा बाद फेरीत प्रवेश केला, अनेक वेळा अंतिम सामनाही खेळायला मिळाला. मात्र, त्यात आलेल्या अपयशाने भारतीय संघावर 'चोकर्स'चा टॅग लागला. भारताने दोन वेळा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते. मात्र, दोन्ही वेळा भारताला पराभवाची चव चाखावी लागली.

विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. सध्या भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे. यात भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी जस्प्रित बुमराहच्या खांद्यावर आहे. बुमराहने पाठीच्या दुखापतीनंतर बऱ्याच काळाने मैदानात पुनरागमन केले.

saurav ganguly
Lucy Letby Case : अखेर न्याय मिळाला! 7 बाळांच्या हत्येप्रकरणी ब्रिटिश नर्सला जन्मठेपेची शिक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com