राष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षक सय्यद अली यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

पुणे : राष्ट्रीय नेमबाज आणि भारतीय नेमबाजी संघाच्या पिस्तूल प्रकाराचे मुख्य प्रशिक्षक सय्यद वाजिद अली (59) यांचे हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले.

म्हाळुंगे बालेवाडी येथील आंतरराष्ट्रीय शूटिंग रेंजवर 60व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल प्रकाराच्या स्पर्धा सुरू होत्या. या स्पर्धेदरम्यान सोमवारी सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

त्यांचे पार्थिव रुग्णालयातून सायंकाळी त्यांच्या नातेवाइकांसोबत नवी दिल्लीला पाठवण्यात आले. तेथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भारतीय रायफल संघटनेचे सचिव राजीव भाटिया यांनी अली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, ""खूप लवकर त्यांनी मुक्ती मिळविली. आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी त्यांच्याशी चर्चा सुरू होती. आता ही चर्चाच थांबली. नेमबाजीचे खूप मोठे नुकसान झाले.''

. . . . . .

Web Title: sayyad wajid ali passes away