रमा, रिचा, रियाचे निर्विवाद वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

पुणे - स्कूलिंपिक्‍स जिम्नॅस्टिक स्पर्धेत एसपीएम प्रशालेच्या रमा साने आणि सेंट जोसेफ प्रशालेच्या रिचा चोरडिया यांनी १६ वर्षांखालील गटात वर्चस्व राखले. १२ वर्षांखालील गटात रिया केळकरने कलात्मक जिम्नॅस्टिकमध्ये पाच सुवर्णपदके मिळवून वर्चस्व राखले. 

पुणे - स्कूलिंपिक्‍स जिम्नॅस्टिक स्पर्धेत एसपीएम प्रशालेच्या रमा साने आणि सेंट जोसेफ प्रशालेच्या रिचा चोरडिया यांनी १६ वर्षांखालील गटात वर्चस्व राखले. १२ वर्षांखालील गटात रिया केळकरने कलात्मक जिम्नॅस्टिकमध्ये पाच सुवर्णपदके मिळवून वर्चस्व राखले. 

डॉ. चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयात सुरू असलेल्या या स्पर्धेत कलात्मक जिम्नॅस्टिक प्रकारात रमा आणि तालबद्ध प्रकारात रिचाने प्रत्येकी तीन सुवर्ण आणि एका ब्राँझपदकासह सर्वसाधारण सुवर्णपदकही जिंकले. रमा व्हॉल्टिंग टेबल, अनइव्हन बार, बॅलन्सिंग बीम या प्रकारांत विजेती ठरली; तर फ्लोअर एक्‍सरसाइजमध्ये तिला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. १२ वर्षांखालील गटात रियाने मात्र या पाचही गटांत सुवर्णपदक मिळविले. तालबद्ध प्रकारात रिचाने रोप, बॉल आणि क्‍लब्ज प्रकारांत सुवर्ण, तर हूप प्रकारात ब्राँझपदक पटकावले. दोघींची हीच कामगिरी त्यांना सर्वसाधारण सुवर्णपदक मिळवून देणारी ठरली.

जिम्नॅस्टिक निकाल
१६ वर्षांखालील मुली ः फ्लोअर एक्‍सरसाइज ः मुक्ता जोशी (डीईएस, ८.७), सानिया केळकर (अभिनव इंग्रजी माध्यम), रमा साने (एसपीएम), व्हॉल्टिंग टेबल ः रमा साने (एसपीएम, ११.६), मुक्ता जोशी (डीईएस), सानिया केळकर (अभिनव इंग्रजी), अनइव्हन बार ः रमा साने (एसपीएम,९.६), मुक्ता जोशी 

(डीईएस), सानिया केळकर (अभिनव इंग्रजी), बॅलन्सिंग बीम ः रमा साने (८.३), सानिया केळकर, मुक्ता जोशी, सर्वसाधारण ः रमा साने (३६.८), मुक्ता जोशी, सानिया केळकर,

तालबद्ध (रोप) ः रिचा चोरडिया (सेंट जोसेफ, पाषाण ८.९७), मैथिली कारंडे (माउंट कॅरमेल), सेजेल खेडेकर (सेंट ॲन्स, कॅम्प), हूप ः सेजल खेडेकर (९.८३), मैथिली कारंडे, रिचा चोरडिया, बॉल ः रिचा चोरडिया (१०.२३), सेजल खेडेकर, मैथिली कारंडे, क्‍लब्ज ः रिचा चोरडिया (१०.१३), सेजल खेडेकर, रिया वाडकर (माउंट कॅरमेल). सर्वसाधारण ः रिचा चोरडिया (३८.७३), सेजल खेडेकर, मैथिली कारंडे. 

मुली (१२ वर्षांखालील) फ्लोअर एक्‍सरसाइज ः रिया केळकर (अभिनव इंग्रजी माध्यम, १०.३५), तन्वी कुलकर्णी (डीईएस), कोमल आपटे (विबग्योर, बालेवाडी), व्हॉल्टिंग टेबल ः रिया केळकर (११.७), तन्वी कुलकर्णी, कोमल आपटे, अनइव्हन बार ः रिया केळकर (६.८), तन्वी कुलकर्णी, निहारिका एडके (सिंबायोसिस इंटरनॅशनल, विमानगर), बॅलन्सिंग बिम ः रिया केळकर (११.२), तन्वी कुलकर्णी, कोमल आपटे, सर्वसाधारण ः रिया केळकर (४०.५), तन्वी कुलकर्णी, कोमल आपटे

तालबद्ध ः रोप ः रिया भांगे (२.७,), विनीभा प्रसाद, रितिका गिरीश (तिघी  ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल, चिंचवड), हूप ः रिया भांगे (२.१), विनीभा प्रसाद , श्रावणी ठाकूर (तिघी  ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल, चिंचवड), बॉल ः रिया भांगे (१.६५), विनीभा प्रसाद (दोघी  ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल, चिंचवड), तनीषा पटेल (विबग्योर, बालेवाडी), क्‍लब्ज ः विनीभा प्रसाद (१.९५), रिया भांगे, श्रावणी ठाकूर (तिघी ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल, चिंचवड), सर्वसाधारण ः रिया भांगे (८.३५), विनीभा प्रसाद, रितिका गिरीश (तिघी  ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल, चिंचवड).

Web Title: schoolympics 2016

टॅग्स