Schoolympics 2023 : सोहम, यशश्रीला ॲथलेटिक्स स्पर्धेत जेतेपद

Schoolympics 2023 : सोहम, यशश्रीला ॲथलेटिक्स स्पर्धेत जेतेपद

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : पूनावाला फिनकॉर्प प्रेझेंट्स सकाळ स्कूलिंपिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये मुलांच्या १४ ते १६ वर्षे वयोगटात १०० मीटर धावणे प्रकारामध्ये सोहम साळुंके सर्वांत वेगवान धावपटू ठरला. त्याने ११.५ सेकंद इतकी वेळ नोंदविली, तर याच वयोगटात मुलींमध्ये यशश्री सपकाळ (१२.८ सेकंद) हिने वेगवान धावपटूचा बहुमान मिळविला. ४ बाय १०० मीटर रिले प्रकारात सूसगावच्या विद्या व्हॅली स्कूलने दुहेरी मुकुट संपादन केला.

सारसबाग येथील कै.बाबूराव सणस क्रीडा मैदानावर वरील स्पर्धा झाली. ४ बाय १०० मीटर रिले प्रकारात मुलांच्या गटात कल्याणीनगरच्या डॉ.एरिन नगरवाला डे स्कूलचा तर मुलींच्या गटात सूसगावच्या विद्या व्हॅली स्कूलचा संघ अजिंक्य ठरला.

सविस्तर निकाल सुवर्ण, रौप्य, ब्राँझ यानुसार पुढील प्रमाणे -

१४ ते १६ वयोगट : तिहेरी उडी : मुले : रिदाम सत्रे, द कल्याणी, मांजरी (१०.७० मी.), युवराज काथेडे, सिंहगड स्प्रिंगडेल, वडगाव (१०.२९ मी.), सुफियान पिताळे, सेठ दगडूराम कटारिया, गुलटेकडी (९.१९ मी.). मुली : निकीता देवकुळे, एमईएस बालशिक्षण मंदिर, कोथरुड (९.४४ मी.), नैशा दोरु, द कल्याणी, मांजरी (८.५७ मी.), अदिती हेगडे, सिंहगड स्प्रिंगडेल, वडगाव (८.४७ मी.).

थाळीफेक : मुले : देवेश क्षीरसागर, सिंहगड स्प्रिंगडेल, वडगाव (२९.३५ मी.), अमर म्हस्के, (२८.७९ मी.), केतन नागरे, दोघेही सरहद, गुजर-निंबाळकरवाडी (२५.२५ मी.). मुली : मृदुल नाडे, हुजूरपागा, लक्ष्मी रस्ता (२२.०२ मी.), दिक्षा शेळके, (२०.११ मी.), वैभवी गेजगे, दोघीही आरएमडी इंग्लिश, शिरुर (१६.८० मी.).

४०० मीटर : मुले : शार्दूल भेगडे, हचिंग्ज, तळेगाव (५५.० सेकंद), केयूर मोहिते, डीएसके, धायरी (५६.९ सेकंद), हरसिमरनजित सिंग, आर्मी पब्लिक, घोरपडी (५७.४ सेकंद). मुली : क्रिष्णाली जगताप, क्रिमसन अनिषा ग्लोबल (६३.६ सेकंद), दक्षा नहार, आचार्य श्री विजय वल्लभ, भवानी पेठ (६४.३ सेकंद), मानसी देवरे, अराइज इंटरनॅशनल, भोसरी (६६.९ सेकंद).

१०० मीटर : मुले : सोहम साळुंके, सरहद, कात्रज (११.५ सेकंद), आर्यन इंगोले, (११.७ सेकंद), अभिज्ञय गोलटेकर, दोघेही एरिन नगरवाला डे, कल्याणीनगर (११.९ सेकंद). मुली : यशश्री सपकाळ, विखे पाटील मेमोरियल, एसबी रस्ता (१२.८ सेकंद), निकिता देवकुळे, एमईएस बालशिक्षण मंदिर, कोथरूड (१३.० सेकंद), सेजल सापते, अभिनव विद्यालय इंग्लिश, एरंडवणे (१४.० सेकंद).

१५०० मीटर : मुले : अभिषेक गुलभिले, भारतीय जैन संघटना, वाघोली (४.५६.७ मिनिटे), अजित उंबरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी, फुलगाव (५.०९.३ मिनिटे), विराज राणा, श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, भूगाव (५.१५.२ मिनिटे). मुली : शर्वरी थोरात, न्यू इंग्लिश, लांडेवाडी (५.५५.१ मिनिटे), चंद्रकला साहू, न्यू इंग्लिश, फुरसुंगी (५.५६.९ मिनिटे), इशिका मुंदडा, विद्या व्हॅली, सूसगाव (६.११.४ मिनिटे).

४ बाय १०० मीटर रिले : मुले : शौनक चौटा, तनय गजर, अमन शाह, स्वराज शिंदे, विद्या व्हॅली, सूसगाव (४८.२ सेकंद), अभिज्ञय गोलटेकर, आर्यन इंगोले, रियान काझी, आदित्य मुळे, एरिन नगरवाला डे, कल्याणीनगर (४९.० सेकंद), आयुष दंख, रिशी कडवे, केयूरसिंह मोहिते, पुष्कर सुराडकर डीएसके, धायरी (४९.१ सेकंद). मुली : ओवी चांदेरे, आहना डांबळकर, इरा दसवानी, इशिका मुंदडा, विद्या व्हॅली, सूसगाव (५८.६ सेकंद), माही निकम, राधा देशपांडे, इनग्रिड मॅन्युअल, सिद्धी कमलाकर, सेंट जोसेफ हायस्कूल, पाषाण (५८.७ सेकंद), सेजल सापते, जान्हवी मेमाणे, आर्या माजगावकर, सिया प्रसादे, अभिनव इंग्लिश मीडियम, एरंडवणे (५९.० सेकंद).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com