Schoolympics 2023 : टेनिस स्पर्धेत बारा ते चौदा वर्षेवयोगटात पुजारी, पोतदारची आगेकूच

Schoolympics 2023
Schoolympics 2023
Updated on

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : सकाळ स्कूलिंपिक्स टेनिस स्पर्धेत बारा ते चौदा वर्षेवयोगटात मुलांमध्ये प्रज्ञेश शेळके, अंशुल पुजारी, नीरज जोर्वेकर, आरुष पोतदारने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून आगेकूच कायम ठेवली आहे.

Schoolympics 2023
Schoolympics 2023 Season 6 : तीन खेळाडूंची हॅट्ट्रिक! स्कूलिंपिकच्या फुटबॉल स्पर्धेत 'या' स्कूलचा दणदणीत विजय

डेक्कन जिमखाना क्लबच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत बारा ते चौदा वयोगटात उपांत्यपूर्व फेरीत मिलेनियम स्कूलच्या अव्वल मानांकित प्रज्ञेश शेळकेने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत ग्रीनवुड स्कूलच्या पुरंजय कुतवळवर ५-० असा, पीआयसीटी स्कूलच्या आठव्या मानांकित अंशुल पुजारीने मिलेनियम स्कूलच्या नमन बागलकोटचा ५-१ असा, दुसऱ्या मानांकित ब्लू रीजच्या नीरज जोर्वेकरने विखे पाटील स्कूलच्या दहाव्या मानांकित नील देसाईचा ५-२ असा तर चौथ्या मानांकित मिलेनियम स्कूलच्या आरूष पोतदारने प्रतिभा स्कूलच्या चौदाव्या मानांकित ओम कलशेट्टीचा ५-२ असा पराभव केला.

Schoolympics 2023
Schoolympics 2023 Season 6 : तीन खेळाडूंची हॅट्ट्रिक! स्कूलिंपिकच्या फुटबॉल स्पर्धेत 'या' स्कूलचा दणदणीत विजय

निकाल :

बारा ते चौदा वयोगट मुले : उप-उपांत्यपूर्व फेरी : प्रज्ञेश शेळके (मिलेनियम स्कूल) वि.वि. सोहम यादव (सीएम इंटरनॅशनल) ५-०; पुरंजय कुतवळ (ग्रीनवुड स्कूल) वि.वि. पार्थ दाभिकर (अभिनव विद्यालय) ५-४ (७); नमन बागलकोट (मिलेनियम) वि.वि. दिविक भारद्वाज (विद्या व्हॅली) ५-०; अंशुल पुजारी (पीआयसीटी स्कूल) वि.वि. यश सकट (सणस विद्यालय) ५-०; आरूष पोतदार (मिलेनियम) वि.वि. अयान भाटिया (कल्याणी स्कूल) ५-१; ओम कलशेट्टी (प्रतिभा स्कूल) वि.वि. अहान पाटील (सेंट अरनॉल्ड) ५-०; नील देसाई (विखे पाटील) वि.वि. दर्श भुरुक (सेवासदन) ५-३.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com