Vasant Dhavan : ज्येष्ठ राष्ट्रीय कबड्डीपटू वसंत ढवण यांचे निधन

महाराष्ट्राचे ज्येष्ठ राष्ट्रीय कबड्डी खेळाडू वसंत ढवण (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सावित्रीबाई, तीन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
Vasant Dhavan
Vasant Dhavansakal

मुंबई : महाराष्ट्राचे ज्येष्ठ राष्ट्रीय कबड्डी खेळाडू वसंत ढवण (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सावित्रीबाई, तीन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

ढवण हे मूळचे कणकवलीचे. ते वयाच्या १४व्या वर्षी मुंबईला आले. लोअर परळ येथील श्रीराम कबड्डी संघाकडून त्यांनी कबड्डी खेळायला सुरुवात केली. अमृतसर येथे १९६१साली झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत ते प्रथम महाराष्ट्राकडून खेळले.

Vasant Dhavan
FIFA World Cup : भारत-अफगाण आज फुटबॉल सामना ; फिफा विश्वकरंडक फुटबॉल पात्रता स्पर्धेतील तिसऱ्या फेरीचे लक्ष्य

त्यानंतर जबलपूर (१९६२), अलाहाबाद (१९६३), कोल्हापूर- महाराष्ट्र (१९६४), हैद्राबाद (१९६५), बडोदे (१९६६) अशा सलग सहा स्पर्धेत ते महाराष्ट्राकडून खेळले; पण त्यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी १९७० मध्ये मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com