esakal | INDvBAN : रोहित-साहाने घेतलेल्या कॅचनं डोळ्याचं पारणं फिटलं! (व्हिडिओ)
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit-Saha-INDvBAN

भारतीय सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक वृद्धिमान साहा यांनी घेतलेले दोन अप्रतिम झेल सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत.

INDvBAN : रोहित-साहाने घेतलेल्या कॅचनं डोळ्याचं पारणं फिटलं! (व्हिडिओ)

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकाता : भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामन्याला शुक्रवारी (ता.22) सुरवात झाली. ईडन गार्डनच्या मैदानावर नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय बांगलादेशने घेतला. 

- मनू भाकरचा विश्वकरंडकात 'सुवर्ण'वेध!

मात्र, इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या भारतीय त्रिकुटाने बांगलादेशची चांगलीच धूळधाण उडवली. या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात नेत्रदीपक कामगिरी केल्यामुळे बांगलादेशचा निम्मा संघ 20 षटकांतच तंबूत परतला होता.  

- #BringBackDhoni धोनीच भारी एमएसके प्रसाद तू खा खारी!

भारतीय सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक वृद्धिमान साहा यांनी घेतलेले दोन अप्रतिम झेल सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. उमेश यादवच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने मोमिनूलचा घेतलेला कॅच आणि इशांत शर्माच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने महमुदुल्लाहचा घेतलेला अप्रतिम झेल डोळ्याचं पारणं फेडणारा ठरला. 

- आता संजूला क्रिकेट खेळायचा आत्मविश्वास तरी राहिल का?

loading image