सेरेना विल्यम्सने दिला मुलीला जन्म

वृत्तसंस्था
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

मोराटोग्लू यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की सेरेना विल्यम्सने मुलीला जन्म दिला असून, तिचे अभिनंदन. तुझ्या भावनांबद्दल मी खूप आनंदी आहे. विशेष म्हणजे मुलीला जन्म दिल्यानंतर आता पुढील वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती खेळणार असल्याचे सेरेनाने म्हटले आहे.

न्यूयॉर्क : अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्सने मुलीला जन्म दिल्याची माहिती तिचे प्रशिक्षक पॅट्रीक मोराटोग्लू यांनी दिली.

मोराटोग्लू यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की सेरेना विल्यम्सने मुलीला जन्म दिला असून, तिचे अभिनंदन. तुझ्या भावनांबद्दल मी खूप आनंदी आहे. विशेष म्हणजे मुलीला जन्म दिल्यानंतर आता पुढील वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती खेळणार असल्याचे सेरेनाने म्हटले आहे. सेरेनाचा विवाह रेडीटचा सहसंस्थापक ऍलेक्सिस ओहनियान याच्याशी होणार आहे.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर राहिलेल्या सेरेनाने 23 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. सेरेनाने आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. जानेवारी 2017 मध्ये गर्भवती असतानाही ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होत, सेरेनाने ग्रँड स्लॅम जिंकून आपल्या चाहत्यांसह अवघ्या टेनिस जगताला आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर तिने अनेकवेळा फोटोशूटही केले होते. 

Web Title: Serena Williams gives birth to baby girl, says coach