esakal | सिरी ए फुटबॉल लीग : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलने यूव्हेन्टसचा दमदार विजय   
sakal

बोलून बातमी शोधा

sakal (11).jpg

सिरी ए फुटबॉल लीग स्पर्धेत यूव्हेन्टस संघाने युडीनिजवर दमदार विजय मिळवला आहे.

सिरी ए फुटबॉल लीग : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलने यूव्हेन्टसचा दमदार विजय   

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

सिरी ए फुटबॉल लीग स्पर्धेत यूव्हेन्टस संघाने युडीनिजवर दमदार विजय मिळवला आहे. यूव्हेन्टस आणि युडीनिज यांच्यात झालेल्या सामन्यात यूव्हेन्टसच्या संघाने युडीनिजचा 4 - 1 ने पराभव केला आहे. आणि या विजयासह यूव्हेन्टसचा संघ क्रमवारीत पाचव्या स्थानावर पोहचला आहे. युडीनिजविरुद्ध काल झालेल्या सामन्यात  यूव्हेन्टस संघाच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने दोन गोल केले. यूव्हेन्टसची पुढची लढत गुरुवारी 7 तारखेला क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मिलान संघासोबत होणार आहे.   

क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या

यूव्हेन्टस आणि युडीनिज यांच्यात झालेल्या सामन्यात, ख्रिस्तियानो रोनाल्डोने पहिल्या सत्रात 31 व्या मिनिटाला पहिला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर यूव्हेन्टस संघाच्या फेडरिकोने 49 व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोने सामन्यातील आपला दुसरा गोल 70 व्या मिनिटाला केला. तर यूव्हेन्टसच्या पॉलो डायबालाने इंज्युरी टाईममध्ये 90+3 मिनिटाला एक गोल नोंदवला. युडीनिज संघाकडून एकमेव गोल मार्विनने 90 व्या मिनिटाला केला. त्यामुळे यूव्हेन्टस संघाने युडीनिजला हरवत स्पर्धेतील सातवा विजय मिळवला. 

दरम्यान, सिरी-ए फुटबॉल क्रमवारीत मिलानच्या संघाने 15 पैकी 11 सामन्यांमध्ये विजय मिळवत 37 अंकांसह पहिले स्थान गाठले आहे. त्यानंतर इंटर मिलानचा  संघ दुसऱ्या स्थानी घसरला आहे. इंटर मिलान संघाने 15 पैकी 11 सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. त्यामुळे त्यांचे 36 अंक आहेत. यानंतर 30 अंकांसह रोमाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर 28 अंकांसह नापोली चौथ्या व 27 अंकांसह यूव्हेन्टसचा संघ पाचव्या नंबरवर पोहचला आहे.            

loading image