UAE T20 League : शाहरूखच्या नाईट रायडर्सने अबू धाबीमधील फ्रेंचायजी घेतली विकत | Shah Rukh Khans Knights Riders Take Over Franchise | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shah Rukh Khans Knights Riders Take Over Franchise in UAE T20 League

शाहरूखच्या नाईट रायडर्सने अबू धाबीमधील फ्रेंचायजी घेतली विकत

दुबई : संयुक्त अरब अमिरीतीमध्ये सुरू होत असलेल्या युएई टी 20 लीग (UAE T20 League) स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स ग्रुपने अबू धाबी फ्रेंचायजीचे मालकी हक्क मिळवले आहेत. ही फ्रेंचायजी अबू धाबी नाईट रायडर्स (ADKR) या नावाने ओळखली जाणार आहे.

हेही वाचा: विराट-शास्त्रींच्या काळात बंद पडलेल्या 'या' परंपरा द्रविडने केल्या पुन्हा सुरू

टी 20 क्रिकेटमध्ये नाईट रायडर्स (Knigts Riders) हा एक चांगला ब्रँड झाला आहे. त्यांनी 2008 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाची मालकी मिळवली होती. त्यानंतर त्यांनी 2015 मध्ये कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये ट्रिनबॅगो नाईट रायडर्स हा संघही विकत घेतला. याचबरोबर काही दिवसांपूर्वी नाईट रायडर्स ग्रुपने अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटमध्ये देखील मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांनी ग्रेटर लॉस एंजल्स भागात फ्रेंचायजी स्थापन केली आहे.

हेही वाचा: जडेजाला अनफॉलो करण्याबाबत खुद्द CSK च्या सीईओंनीच केला खुलासा

बॉलिवडू सुपर स्टार शाहरूख खान (Shah Rukh Khan), जुही चावला आणि त्यांचे पती जय मेहता यांनी नाईट रायडर्स ग्रुपमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांनी आता चौथी टी 20 फ्रेंचायजी स्थापन केली आहे. नाईट रायडर्सचे आता आयपीएल, सीपीएल, एमएलसी आणि आता युएई टी 20 लीगमधील संघाची मालकी मिळवली आहे. याबाबत शाहरूख खानने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला 'गेल्या काही वर्षापासून आम्ही नाईट रायडर्स या ब्रँडचा जगभर विस्तार करत आहोत. आम्ही युएईमधील टी 20 क्रिकेट स्पर्धेत असलेली क्षमतेवर बारीक नजर ठेवून होतो. आम्ही युएई टी 20 लीगचा भाग होण्यास उत्सुक होतो. ही लीग मोठ्या प्रमाणावर यश मिळवले यात काही शंका नाही.'

Web Title: Shah Rukh Khans Knights Riders Take Over Franchise In Uae T20 League Name Abu Dhabi Knight Riders

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top