विराट-शास्त्रींच्या काळात बंद पडलेल्या 'या' परंपरा द्रविडने केल्या पुन्हा सुरू | Rahul Dravid Revive Team India Old Tradition | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Dravid Revive Team India Old Tradition

विराट-शास्त्रींच्या काळात बंद पडलेल्या 'या' परंपरा द्रविडने केल्या पुन्हा सुरू

विराट कोहली (Virat Kohli) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) या जोडीने भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. मात्र या दोघांच्या कार्यकाळात भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. दरम्यान, रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) गळ्यात पडली. यानंतर विराटचे कर्णधारपद गेले आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातात संघाच्या नेतृत्वाची धुरा आली. यानंतर भारतीय संघात अनेक बदल झाले. जुन्या शास्त्रींच्या काळात बंद झालेल्या परंपरा (Team India Old Tradition) राहुल द्रविडने पुन्हा सुरू केल्या आहेत. रोहित आणि राहुल ही जोडी भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकून देण्यासाठी कंबर कसत आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळाची धडाकेबाज सुरूवात केली.

हेही वाचा: जडेजाला अनफॉलो करण्याबाबत खुद्द CSK च्या सीईओंनीच केला खुलासा

काही वृत्तानुसार राहुल द्रविड आल्यापासून भारतीय क्रिकेट संघात बऱ्याच गोष्टी नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत. रवी शास्त्री - विराट कोहली जोडीच्या कार्यकाळात भारतीय संघातील अनेक परंपरा बंद झाल्या होत्या. मात्र राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर या परंपरा पुन्हा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. राहुल द्रविडने काही महिन्यांपूर्वी झालेल्या कसोटी मालिकेत चांगल्या खेळपट्ट्या तयार केल्याबद्दल ग्राऊंड स्टाफला 35,000 हजार रूपयांचे बक्षीस दिले होते. त्यांनी कानपूरमध्ये खेळवल्या गेलेल्या पहिल्या आणि वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कसोटीत चांगली खेळपट्टी तयार केल्याबद्दल ग्राऊंड्समनना बक्षीस दिले.

हेही वाचा: द्रविड दुकानात आला अन् शांतपणे मागच्या रांगेत बसला, फॅन करतायत कौतुक

ग्राऊंड्समनना बक्षीस देण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून लुप्त झाली होती. ही परंपरा यापूर्वी भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि एमएस धोनी पर्यंतच्या कर्णधारांनी त्यांच्या त्यांच्या कार्यकाळात कायम राखली होती. आता खंडीत झालेली परंपरा राहुल द्रविडने पुन्हा एकदा सुरू केली आहे. याचबरोबर पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना दिग्गज खेळाडूच्या हस्ते पदार्पणाची कॅप देण्याची पद्धत देखील राहुल द्रविडच्या कार्यकाळात पुन्हा एकदा सुरू झाली आहे. नुकतेच श्रेयस अय्यरला पदार्पणाच्या कसोटीत भारताचे दिग्गज फलंदाज सुनिल गावसकर यांच्या हस्ते कॅप दिली होती.

हेही वाचा: 'BCCI चा खरा कंट्रोल भाजपकडेच' PCB च्या माजी चेअरमनचा दावा

याचबरोबर राहुल द्रविडने अनिल कुंबळेचे धोरण पुन्हा कार्यान्वित केले आहे. अनिल कुंबळेच्या कार्यकाळात अनफिट आणि खराब फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये आपला फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करूनच भारतीय संघात स्थान मिळवता येत होते. हे धोरण राहुल द्रविडने देखील अवलंबले आहे. राहुल द्रविडला आयपीएलमधील कामगिरीवर भारतीय संघात निवड होण्याची पद्धत देखील बंद करायची आहे. जर कसोटी संघात स्थान मिळवायचे असेल तर आयपीएलची कामगिरी पाहिली जाणार नाही. जर भारतीय संघात एका खेळाडूला पुनरागमन करायचे असेल तर त्याला मॅच फॉर्म आणि फिटनेस हा सिद्धच करावा लागणार आहे.

Web Title: Rahul Dravid Revive Team India Old Tradition Which Vanished In Kohli Shastri Era

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top