आफ्रिदी म्हणतो, गंभीरला अक्कल नाही तरी त्याला मते दिली

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मे 2019

पाकिस्तानसोबत क्रिकेटही खेळू नये हे गौतमने म्हटले असल्याने त्याच्या बुद्धीवरून कळत आहे की त्याला काही अक्कल नाही. शिक्षित लोक कधी अशी वक्तव्ये करत नाहीत. हा मूर्खपणा आहे. नागरिकांनी ज्याला निवडून दिले त्याला काही अक्कल नाही.

नवी दिल्ली : भारतीय संघाचा सलामीवीर गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यांच्यातील द्वंद्व सर्वांना माहिती आहेच. आता यात आणखी भर पडली असून, आफ्रिदीने चक्क गंभीरला अक्कल कमी असल्याचे म्हटले आहे.

पूर्व दिल्लीतून भाजपकडून खासदार झालेल्या गौतम गंभीरबाबत आफ्रिदीला विचारले असता त्याने हे उत्तर दिले. भर मैदानात या दोघांमधील वाद पाहायला मिळालेले होते. त्यानंतर नुकतेच पुलवामा हल्ल्यावरून गंभीर पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवायला नको हवेत असे म्हटले होते. भारताने पाकिस्तानसोबत खेळातही संबंध ठेवू नये असे म्हटले होते. याविषयी आफ्रिदीला पत्रकार परिषदेत विचारले असता आफ्रिदीने हे वक्तव्य केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वकरंडक स्पर्धेत 16 जूनला सामना आहे.

आफ्रिदी म्हणाला, की पाकिस्तानसोबत क्रिकेटही खेळू नये हे गौतमने म्हटले असल्याने त्याच्या बुद्धीवरून कळत आहे की त्याला काही अक्कल नाही. शिक्षित लोक कधी अशी वक्तव्ये करत नाहीत. हा मूर्खपणा आहे. नागरिकांनी ज्याला निवडून दिले त्याला काही अक्कल नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahid Afridi attack on Gautam Gambhir ICC World cup 2019