Shahid Afridi : आफ्रिदीने खेळपट्टीवर खड्डा पाडल्याची दिली कबुली; म्हणाला ही माझी मोठी चूक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahid Afridi Confess Done Pitch Tampering

Shahid Afridi : आफ्रिदीने खेळपट्टीवर खड्डा पाडल्याची दिली कबुली; म्हणाला ही माझी मोठी चूक!

Shahid Afridi Pitch Tampering : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. शाहिद आफ्रिदीने समा टीव्हीशी बोलताना मान्य केले की त्याने खेळपट्टीशी छेडछाड केली होती. असे करणे ही माझी मोठी चूक होती.

आफ्रिदी समा टीव्हीशी बोलताना म्हणाला की, 'फैसलाबादमध्ये एक कसोटी सामना खेळला जाणार होता. मी सामन्यात माझे सर्वस्व पणाला लावून गोलंदाजी करत होते. मात्र खेळपट्टीकडून काही केल्या मदत मिळत नव्हती. तेवढ्यात एक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला सर्वांचे लक्ष त्याकडे गेले. दम्यान मी शोएब मलिकशी बोलताना म्हणाला की मला खेळपट्टीवर एक रफ पॅच (खड्डा) तयार करावे असे वाटते आहे. यामुळे चेंडू स्पिन व्हायला मदत होईल. मलिक देखील म्हणाला हो पॅच तयार कर कोणी तुझ्याकडे बघत नाहीये.'

हेही वाचा: Video : बेबी एबीकडून 500 च्या स्ट्राईक रेटने धुलाई; 0,6,6,6,6,6 अजून काय पाहिजे?

शाहिद आफ्रिदी पुढे म्हणाला की, 'मग मी खेळपट्टीवर एक रफ पॅच बनवला मग खेळपट्टीकडून मला मदत मिळण्यास सुरूवात झाली. जे काही झालं ते जुनी गोष्ट आहे. मात्र आता मागे वळून पाहताना या गोष्टीचा मला पश्चाताप होत आहे. ही माझी चूक होती मी असं करायला नको होतं. मी चुकीचं केलं मी असं करायला नको होतं.'

हेही वाचा: Video : सचिन तेंडुलकरने वयाच्या 49 व्या वर्षीही खेळली तुफानी पारी

आफ्रिदी ज्या कसोटीबद्दल बोलत आहे ती कसोटी 2005 मध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झाली होती. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तो दुसरा कसोटी सामना होता. पाकिस्तानने मुल्तानमध्ये पहिला कसोटी सामना 22 धावांनी जिंकला होता. तर दुसरा फैसलाबाद कसोटी सामना ड्रॉ झाला होता. दरम्यान, पाकिस्तानने तिसऱ्या लाहोर कसोटीत एक डाव आणि 100 धावांनी विडय मिळवून मालिका 2 - 0 अशी खिशात टाकली होती.

शाहिद आफ्रिदीने आपल्या कारकिर्दित 27 कसोटी सामने खेळले आहेत. तर 398 वनडे आणि 99 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Web Title: Shahid Afridi Confess Done Pitch Tampering During 2005 Faisalabad Test Against England

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..