आफ्रिदीची सटकली! मुलगी आरती करते म्हणून केला टीव्हीचा चुराडा

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून पाकिस्तानच्या लोकांत भारतीय आणि हिंदूंबद्दल किती मत्सर आहे हे यातून कळते. 

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या संघात हिंदू असल्यामुळे दानिश कनेरियाला इतर खेळाडूंच्या रोषाला सामोरे जावे लगाल्याचे नुकतेच उघड झाले आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात खळबळ माजली असतानाच पाकिस्तानचा मजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये आपली मुलगी हिंदू धर्माचे पालन करताना दिसल्याने मी रागाने टीव्ही फोडल्याचे त्याने कबूल केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्याने हा किस्सा शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अॅंकरने त्याला 'तुम्ही टीव्ही का फोडला' असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, ''स्टार प्लस ही भारतीय वाहिनी पाकिस्तानातही दाखवली जाते. या वाहिनीवरील काही मालिका माझी पत्नीही पाहते. त्यांत खूप ड्रामा असतो म्हणून ते पाहात नको जाऊस असं मी माझ्या पत्नीला सांगितलं होतं. एक दिवस मी घरात असताना माझी मुलगी भारतीय मालिकेतील दृश्य पाहून आरतीचं ताट घेऊन आरती करत होती. हे पाहून मला प्रचंड राग आला आणि मी थेट टीव्हीच फोडून टाकला.''  

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून पाकिस्तानच्या लोकांत भारतीय आणि हिंदूंबद्दल किती मत्सर आहे हे यातून कळते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahid Afridi confessed of breaking tv as his daughter was watching indian serial