Shahid Afridi React On Rohit Sharma : शेजाऱ्यांचा हक्क असतो तो... रोहितच्या 'सकारात्मक' वक्तव्यावर आफ्रिदीची प्रतिक्रिया

Shahid Afridi react on Rohit Sharma Wanted To Play Test Cricket With Pakistan
Shahid Afridi react on Rohit Sharma Wanted To Play Test Cricket With Pakistan esakal

Shahid Afridi react on Rohit Sharma Wanted To Play Test Cricket With Pakistan : भारताचा कसोटी कर्णधार रोहित शर्माने नुकतेच तो पाकिस्तानसोबत कसोटी सामने खेळण्यासाठी तयार असल्याचं वक्तव्य केलं होतं. यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका सुरू होणार का अशी चर्चा पुन्हा सुरू झाली. यावर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने आपले मत व्यक्त केलं आहे. रोहित शर्माच्या या सकारात्मक वक्तव्याचं शाहिद आफ्रिदीने स्वागत केलं.

Shahid Afridi react on Rohit Sharma Wanted To Play Test Cricket With Pakistan
IPL 2024 : रोहित अन् बुमराहनं टीका करताच बीसीसीआय आपल्या 'त्या' निर्णयाचा करणार पुनर्विचार

शाहिद आफ्रिदी समा टीव्हीशी बोलताना म्हणाला की, 'नक्कीच हे खूप चांगले उत्तर आहे. मालिका व्हायलाच हवी. भारतीय कर्णधाराकडून एक सकारात्मक वक्तव्य आलं आहे. तो भारताचा दूत आहे. आम्ही कायम म्हणत आलो आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यात खेल विशेषकरून क्रिकेट हे मोठं योगदान देऊ शकतं. आम्ही भारतात जाऊन क्रिकेट खेळत होतो. यामुळे एक नातं तयार होतं. शेजारी आहोत नातं जितकं चांगलं होईल तितकं चांगलं असतं शेजाऱ्यांचा हक्क असतो तो.'

Shahid Afridi react on Rohit Sharma Wanted To Play Test Cricket With Pakistan
IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या पोलार्डसह 'या' खेळाडूवरही BCCI ने घेतली ॲक्शन; ड्रेसिंग रुममधून खाणाखुणा करणं आलं अंगलट

रोहित शर्माने नुकतेच पाकिस्तानसोबत कसोटी सामने खेळण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे या दोन्ही देशातील द्विपक्षीय कसोटी मालिका पुन्हा सुरू कराव्यात या मागणीला बळ मिळालं आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉगनने रोहितला विचारलं होतं की जर भारत आणि पाकिस्तानने सातत्यानं क्रिकेट खेळणं कसोटी क्रिकेटसाठी उपयुक्त ठरेल का?

यावर रोहित शर्मा म्हणाला की, 'पाकिस्तान एक चांगला संघ आहे यावर माझा विश्वास आहे. त्यांच्याकडे उत्तम गोलंदाज आहेत. त्यामुळे आम्ही विदेशात खेळलो तर चांगली स्पर्धा निर्माण होईल. शेवटची कसोटी ही 2007 - 08 मध्ये खेळली गेली होती.'

'मला पाकिस्तानविरूद्ध खेळायला आवडेल. बॉल आणि बॅटमधील हे चांगले द्वंद्व असेल. आम्ही त्यांच्याविरूद्ध आयसीसी स्पर्धांमध्ये खेळतोय. निव्वळ चांगलं क्रिकेट याबद्दल मी बोलतोय त्यामुळे नक्कीच खेळायला आवडेल.'

(Cricket News In Marathi)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com