कनेरियावर धर्मांतरासाठी दबाव... काय म्हणाला शाहिद आफ्रिदी? | Shahid Afridi Statement About Danish Kaneria | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahid Afridi Statement About Danish Kaneria

कनेरियावर धर्मांतरासाठी दबाव... काय म्हणाला शाहिद आफ्रिदी?

नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेटमध्ये दानिश कनेरियाने (Danish Kaneria) शाहिद आफ्रिदीवर (Shahid Afridi) गंभीर आरोप केल्यानंतर एक भूकंप आला होता. त्याने हिंदू (Hindu) असल्यानेच शाहिद आफ्रिकी माझा छळ करायचे असा खुलासा केला होता. शोएब अख्तरने देखील याला दुजोरा दिला होता. कनेरियाने आफ्रिदी माझ्यावर मुस्लिम (Muslim) धर्म स्विकारण्यासाठी दबाव टाकत होता असा दावा केला होता. शाहिद आफ्रिदीने दानिश कनेरियाला दीर्घ काळ बेंचवर बसवून ठेवले होते. त्याला एकदिवसीय संघात स्थान मिळत नव्हते असेही कनेरिया सांगत होता.

हेही वाचा: MI vs GT : 'रोहित, पोलार्ड, बुमराहला आता विश्रांती द्या'

आता याबाबत खुद्द शाहिद आफ्रिदीने आपले म्हणणे मांडले (Shahid Afridi Statement) आहे. त्याने दानिश कनेरियाने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. उलट त्याने कनेरियावरच आरोप केला की दानिश कायम त्याला पाण्यात बघायचा, कमी लेखायचा. आफ्रिदी म्हणाला की, 'दानिश स्वस्तात प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि पैसा कमावण्यासाठी या सारखे आरोप करत आहे.'

हेही वाचा: IPL 2022: आईने गर्भपात केला असता तर हा स्टार जगाला मिळाला नसता

आफ्रिदी पुढे म्हणतो की, 'कनेरिया त्याच्यासाठी भावासारखा होता. मी कायम त्याला साथच दिली आहे. तो आता माझ्यावर का आरोप करत आहे? त्यावेळी त्याने माझ्या वागणूकीबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आणि हबीब बँक लिमिटेडकडे तक्रार का केली नाही? त्याने हे सांगितले पाहिजे. प्रत्येकाला दानिशचे व्यक्तीमत्व माहिती आहे.' आफ्रिदीने दानिशच्या मॅच फिक्सिंगकडे लक्ष वेधले. 'कनेरियाने इंग्लंडमध्ये स्पॉट फिक्सिंग केली होती. त्याला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. तो आमच्या विरोधी देशाला (भारत) मुलाखती देत आहे आणि धार्मिक भावना भडकवत आहे.'

Web Title: Shahid Afridi Statement About Danish Kaneria Allegation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top