IND vs PAK : भारताच्या सामन्यापूर्वीच पाकला दुखापतींची दृष्ट; अजून एक वेगवान गोलंदाज आऊट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahnawaz Dahani Miss India vs Pakistan Asia Cup Super 4 Match Due To Injury Set Back For Pakistan Bowling Attack

IND vs PAK : भारताच्या सामन्यापूर्वीच पाकला दुखापतींची दृष्ट; अजून एक वेगवान गोलंदाज आऊट

IND vs PAK Asia Cup T20I : आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा रविवारी भिडणार आहेत. सुपर 4 मधील या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज होत असतानाच पाकिस्तान संघाला एक मोठा धक्का बसला. पाकिस्तानला दुखापतींनी सतावले आहे. त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी देखील आशिया कपला मुकला आहे. आता शाहनवाज दहानी देखील दुखापतीमुळे भारताविरूद्धच्या सामन्याला मुकणार आहे. (Shahnawaz Dahani Miss India vs Pakistan Asia Cup Super 4 Match Due To Injury Set Back For Pakistan Bowling Attack)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यानुसार शाहनवाज दहानीला साईड स्ट्रेन दुखापत झाली आहे. ही दुखापत त्याला हाँगकाँग विरूद्धच्या सामन्यात झाली आहे. वक्तव्यानुसार दहानी वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली 48 ते 72 तास असणार आहे. यानंतर तो आशिया कपमधील पुढचे सामने खेळू शकेल की नाही याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

शहानवाजने भारताविरूद्धच्या सामन्यात गोलंदाजीत फारशी चमक दाखवली नव्हती. त्याने 4 षटकात 29 धावा दिल्या होत्या. मात्र त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. मात्र त्याने फलंदाजीत शेवटच्या दोन षटकात 6 चेंडूत 16 धावा चोपून पाकिस्तानला 147 धावांपर्यंत पोहचवले होते. हाँगकाँग विरूद्धच्या सामन्यात दहानीने 2 षटकात 7 धावा देत 1 बळी मिळवला होता.