वर्ल्डकप मधील खराब कामगिरीनंतर कर्णधाराला मारहाण? शाकीब उल हसनच्या व्हिडिओचे सत्य घ्या जाणून

वर्ल्डकप मधील खराब कामगिरीनंतर कर्णधाराला मारहाण? शाकीब उल हसनच्या व्हिडिओचे सत्य घ्या जाणून

एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मध्ये बांगलादेशची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. या संघाला नऊपैकी केवळ दोनच सामने जिंकता आले आणि सात सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. चार गुणांसह हा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर राहिला आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला.

बांगलादेशने श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरुद्धचे दोन सामने जिंकले. नेदरलँड्ससारख्या संघाविरुद्धही बांगलादेशला 87 धावांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.

बांगलादेश संघाच्या खराब कामगिरीमुळे चाहते दु:खी झाले असून कर्णधार शाकीबला त्याचा फटका सहन करावा लागला. शाकीबचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चाहत्यांनी त्याला घेरले आणि धक्काबुक्की करायला सुरुवात केली. अनेक चाहते त्याच्याशी भांडू लागले. शाकीबसोबत उपस्थित असलेल्या लोकांनी कसा तरी त्याला गर्दीतून बाहेर काढले.

व्हिडीओ पाहून असे दिसते की, व्हिडीओ पाहून असे दिसते की, शकीब एका ज्वेलरी शॉपमध्ये जात असताना त्याच्यावर हल्ला केला.

शाकीब उल हसनच्या व्हिडिओचे सत्य घ्या जाणून

मात्र, हा व्हिडीओ या वर्षी मार्च महिन्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. आणि बांगलादेशच्या खराब कामगिरीनंतर तो सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. यावरून बांगलादेशचे चाहते संघाच्या कामगिरीने किती निराश झाले आहेत हे दिसून येते.

या वर्ल्ड कपमध्ये शाकिबने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आणि 17.33 च्या सरासरीने त्याला केवळ 104 धावा करता आल्या. तमिम इक्बालसोबतच्या वादानंतर त्याला सतत टीकेला सामोरे जावे लागले आहे. तमिम इक्बाल हा वर्ल्ड कप खेळू शकला असता, पण काही वादामुळे तो संघात सामील झाला नाही आणि बांगलादेशची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. मात्र, आठव्या क्रमांकावर राहून हा संघ पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com