IND vs BAN: सरावावेळी असं काही घडलं! बांगलादेशचा कर्णधार थेट ॲम्ब्युलन्समधून गेला रूग्णालयात

सामन्यापूर्वी बांगलादेश संघाला मोठा धक्का ....
shakib al hasan
shakib al hasansakal

Shakib al Hasan Hospital Ind vs Ban : भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना चट्टोग्राम येथे होणार आहे. त्याचबरोबर या सामन्यापूर्वी बांगलादेश संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार शाकिब अल हसन जखमी झाला असून त्याला रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयात नेण्यात आले आहे.

shakib al hasan
Anand Mahindra : केनच्या हुकलेल्या पेनाल्टीवर आनंद महिंद्रांचा प्रश्न, वेळेत उत्तर द्या अन् जिंका गाडी

कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच बांगलादेश संघाला मोठा धक्का बसू शकतो. वास्तविक संघाचा कर्णधार शाकिब अल हसनला दुखापतीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खरं तर, सामन्यापूर्वी शकीब चट्टोग्रामच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर पोहोचला आणि सकाळी 10 वाजण्यापूर्वी निघून गेला. स्टेडियममधून त्याला अॅम्ब्युलन्स रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणी माहिती देताना बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सांगितले की, 'काहीही गंभीर नाही'. वाहतुकीचे अन्य कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने त्यांना रुग्णवाहिकेने पाठवण्यात आले आहे. तो हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेला आहे.

shakib al hasan
Ind vs Ban Test Series: टॉप ऑर्डर निश्चित! परंतु गोलंदाजांनी वाढवली डोकेदुखी

कसोटी मालिकेसाठी भारत आणि बांगलादेशचे संघ -

  • भारत - लोकेश राहुल (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, शुभमन गिल, विराट कोहली, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत (विकेट-कीपर), श्रीकर भारत (विकेट-कीपर). कीपर), जयदेव उनाडकट, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव.

  • बांगलादेश - शकिब अल हसन, नजमुल हुसेन, मोमिनुल हक, यासिर अली, मुशफिकुर रहीम, लिटन दास, नुरुल हसन, मेहिदी हसन, तैजुल इस्लाम, तस्किन अहमद, खालिद अहमद, इबादत हुसेन, शरीफुल इस्माल, झाकीर हसन, महमुदुल हसन , राजूर रहमान, अनामूल हक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com