पॉप सिंगर शकिराच्या खासगी जीवनात मोठी उलथापालथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पॉप सिंगर शकिराच्या खासगी जीवनात मोठी उलथापालथ, स्टार फुटबॉलरने दिला धोका
पॉप सिंगर शकिराच्या खासगी जीवनात मोठी उलथापालथ

पॉप सिंगर शकिराच्या खासगी जीवनात मोठी उलथापालथ, स्टार फुटबॉलरने दिला धोका

पॉप सिंगर शकिरा (pop singer) सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळं चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्यावार फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे तिला तुरुंगवास भोगावा लागेल असे तर्क वितर्क लावण्यात येत होते. अशातच शकीराला तिच्या बॉयफ्रेंडने धोका दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: दीपक चाहर क्लिन बोल्ड, जया भारद्वाजसोबत अडकला लग्नबंधनात

स्पेन दिग्गज पॉप सिंगर शकीराने तिचा पार्टनर आणि स्पेन दिग्गज फुटबॉलर जेरार्ड पीके यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. पीके दुसऱ्या महिलेसोबत रिलेशनशिप मध्ये आहे. त्याने विश्वासघात केला असा आरोप शकीराने लावला आहे.

हेही वाचा: दीपक चाहर नव्हे, तर 'या' परदेशी क्रिकेटरच्या लग्नाला पोहचला के एल राहुल

शकीरा आणि पीके हॉलीवुडचे सर्वांच आवडते कपल आहे. दोघे २०१० विश्वकपनंतर दक्षिण अफ्रिकामध्ये रिलेशनशिपमध्ये आले होते. त्यावेळी फुटबॉल फीफा वर्ल्‍ड कप च्या ऑफिशियल सॉन्गमध्ये दोघे एकत्र दिसले होते. सध्या पीके शकीरापासून बार्सिलोना येथील केल मुन्टोनेरमध्ये एकटा राहत आहे.

मिळालेल्या माहितनुसार, पीके त्याची सेकेंड गर्लफ्रेंड सोबत आपली लाईफ एन्जॉय करत आहे. इतकेच नव्हे तर त्याची सेकेंड गर्लफ्रेंडचे त्याच्या घरीदेखील जाते.

स्पेनशिवाय ३५ वर्षीय पीके बार्सिलोना या दिग्गज क्लबकडूनही खेळतो. तथापि, तो बऱ्याच काळापासून क्लबच्या मुख्य बचावपटूंच्या यादीतून बाहेर आहे. त्याला ओपनिंग प्लेइंग-11 मध्येही स्थान दिले जात नाही. क्लब मॅनेजर झेवी हर्नांडेझ रोनाल्ड अरौजो आणि एरिक गार्सिया यांना पीकेसाठी ला लीगाच्या जागी ऑफर करत आहे.

Web Title: Shakira And Gerard Pique Breakup

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :hollywoodFootball
go to top