Shane Warne : जर्मन महिलेनंतर CCTV फुटेजमध्ये दिसल्या मसाज गर्ल्स

Shane Warne Death Case
Shane Warne Death Case Sakal

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. थायलंडमधील एका व्हिलामध्ये त्याचा मृत्यू झाला. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तो याठिकाणी गेला होता. त्याच्या मृत्यूनंतर अनेक मुद्दे चर्चेचा विषय ठरत आहे. पोलिस तपास, शवविच्छेन अहवाल यामुळे अनेक गोष्टी चर्चेत आहेत. शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर आतापर्यंत वेगवेगळे मुद्दे चर्चेत आले आहेत. आतापर्यंत नेमक काय झालं यावर एक नजर....

4 मार्च 2022 रोजी थायलंमधील एका व्हिलामध्ये शेन वॉर्नला ह्रदय विकाराचा झटका आला. यातच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या रुममध्ये रक्ताचे डाग आढळल्याने वॉर्नच्या मृत्यूमागे काही गूढ आहे का? असा प्रश्न निर्माण झाला होता. वॉर्नला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर आपात्कालीन परिस्थितीमध्ये सहकाऱ्यांनी वॉर्नच्या छातीवर दाब देऊन सीपीआर (CPR)च्या माध्यमातून त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावेळी त्याच्या तोंडातून रक्त बाहेर पडले होते. रक्ताचे डाग त्याच्या रुममध्ये आढळून आल्याचे स्पष्ट झाले आहे.

थायलंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉर्नला ज्यावेळी रुग्णवाहिकेत नेण्यात येत होते त्यावेळी त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला मृत घोषीत करण्यात आले. ज्यावेळी शेन वॉर्नला रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्या रुग्णवाहिकेत एक जर्मन महिला पुष्पगुच्छ घेऊन आली होती. ही महिला कोण असा प्रश्नही निर्माण झाला. ती वॉर्नची मोठी चाहती होती आणि ती वैयक्तिकरित्या ती त्याला ओळखत असल्याचेही पोलिस तपासात समोर आले.

Shane Warne Death Case
जेव्हा शेन वॉर्न ने रविद्र जडेजाला बसमधून उतरायला सांगितले; वाचा किस्सा

जर्मन महिलेनंतर आता शेन वॉर्नच्या व्हिलामध्ये मसाजसाठी काही तरुणी आल्याचेही समोर आले आहे. व्हिलाचे काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. यात मृत्यूपर्वी काही तरुणी शेन वॉर्न वास्तव्यास असलेल्या व्हिलामध्ये आल्या होत्या. वॉर्न आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मसाजसाठी त्यांना बोलावले होते, अशी माहिती समोर येत आहे. मसाजसाठी आलेल्या एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती ज्यावेळी वॉर्नच्या रुम जवळ गेली त्यावेळी तिला कोणताही रिस्पॉन्स मिळाला नाही. तिने लगेच याची कल्पना आपल्या बॉसलाही दिली होती. ज्यावेळी शेन वॉर्नच्या मृत्यूची माहिती समोर आली त्यावेळी चार महिला याठिकाणहून बाहेर पडल्या होत्या. यातील दोन महिलांनी शेन वॉर्नच्या मित्राला मसाज दिले. शेन वॉर्नपर्यंत कोणतीही महिला पोहचू शकली नव्हती. शेन वॉर्न ज्या व्हिलात मुक्कामी होता त्याठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणतीही संशायस्पद गोष्ट नसल्याचे थायलंड पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com