गावसकरांना स्टेडियम बांधायला सांगितलं असतं तर आज क्रिकेट कुठं असतं? : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुलींची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध नियुक्ती झाली. त्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनीही गांगुलींचे अभिनंदन करत त्यांची निवड अत्यंत योग्य असल्याचे म्हणत त्यांना समर्थन केले आहे. 

मुंबई :  भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुलींची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध नियुक्ती झाली. त्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनीही गांगुलींचे अभिनंदन करत त्यांची निवड अत्यंत योग्य असल्याचे म्हणत त्यांना समर्थन केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत आज (बुधवार) शरद पवार यांनी साम वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी गांगुलीच्या निवडीचे समर्थन केले. 

सचिन, लारा पुन्हा मैदानात; खेळणार ट्वेंटी20 सामना

गांगुलींच्या नियुक्तीचे समर्थन करताना पवार म्हणाले,''मी मुंबई क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय आणि आयसीसीचाही अध्यक्ष होतो. त्यावेळी काम करताना मी कामाचे दोन भाग केले होते. क्रिकेट सामन्यांचा एक भाग आणि क्रिकेटसाठी लागणाऱ्य़ा पायाभूत सोयी सुविधा, माजी खेळाडू यांचा एक भाग. आमच्या सारख्या राजरकारण्यांनी याच भागात कामं केली पाहिजेत.'' 

पुढे ते म्हणाले, ''माझ्या कार्यकाळात मी निवड समितीतील सदस्यांची निवड तसेच खेळाडूंच्या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी वेगळी समिती नेमला होती. त्या समितीचे काम सुनील गावसकर पाहायचे. आता जर त्यांनी स्टेडियम बांधायला सांगितलं असतं तर क्रिकेटचं काय झालं असतं? म्हणूनच पायाभूत सुविधांच काम पाहणं ही आम्हा राजकारण्यांची जबाबदारी आहे तर खेळासंदर्भात सगळे निर्णय हे खेळाडूंनेच घ्यायला हवेत म्हणूनच आम्ही संघटना म्हणून पुढे गेलो. गांगुलीसुद्धा अध्यक्ष म्हणून  नक्कीच चांगले काम करेल अशी माझी खात्री आहे. बंगाल क्रिकेट  कामगिरी त्यांनी सर्मथपणे पार पाडली आणि म्हणूनच तो बीसीसीआयच्या अध्यक्षपदी आले. 

IPL 2020 : अखेर ठरलं! अश्विन खेळणार या संघाकडून

दरम्यान माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांचे नाव जवळपास निश्चित होत असताना नाट्यमय घडामोडीनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली याची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांची सचिनवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  तर भाजपचे मंत्री आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे भाऊ अरुण धुमाळ यांची खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar Congratulates Sourav Gangu;y fro being elected as BCCI president