गुडघा दुखापतीमुळे शार्दुल रणजी सामन्यास अनुपलब्ध

केरळविरुद्धचा हा रणजी सामना तिरुआनंतपुरम येथे येत्या शुक्रवारपासून सुरु होत आहे.
shardhul thakur
shardhul thakur

मुंबई : वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर मुंबईच्या तिसऱ्या रणजी सामन्यासाठीही अनुपलब्ध असेल. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शार्दुलच्या गुडघ्याला दुखापत झाली होती त्यातून तो तंदुरुस्त झालेला नाही. केरळविरुद्धचा हा रणजी सामना तिरुआनंतपुरम येथे येत्या शुक्रवारपासून सुरु होत आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परतल्यानंतर शार्दुल मुंबईकडून एकही रणजी सामना खेळलेला नाही. अफगाणिस्तानविरुद्धची मालिका आणि त्यानंतर होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी शार्दुलचा निवड समितीने विचार केला नाही. गुडघा दुखापतीतून बरे होण्यासाठी आपल्याला अजून दोन अठवडे लागतील असे त्याने मुंबई क्रिकेट संघटनेला कळवल्याचे संघटनेचे सचिव अजिंक्य नाईक यांनी सांगितले. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून शार्दुलची दुखापत आणि त्याची तंदुरुस्ती अधिकृतपणे आम्हाला कळवली जाण्याची प्रतिक्षा करत आहोत, असेही नाईक म्हणाले.

मुंबईचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), जय बिस्ता, भुपेन लालवानी, अमोघ भटकळ, शिवम दुबे, सुवेद पारकर, प्रसाद पवार, हार्दिक तामोरे, शम्स मुलानी, तनुष कोटियन, अर्थव अंकोलेकर, मोहित अवस्थी, धवल कुलकर्णी, रॉस्टन डायस, सिल्व्हेस्टर डिसुझा, हिमांशू सिंग.

शिवम दुबेची निवड

अफगाणिस्तानविरुद्धची मालिका गाजवणारा शिवम दुबेची केरळविरुद्धच्या सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्याचवेळी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रेयस अय्यरची निवड भारतीय संघात करण्यात आलेली असल्यामुळे तोही या रणजी सामन्यासाठी अनुपलब्ध असेल. तिरुअनंतपुरम येथील खेळपट्टी फिरकीस साथ देण्याची शक्यता असल्यामुळे निवड समितीने हिमांशू सिंग या फिरकी गोलंदाजाची निवड करण्यात आली. सी.के. नायडू २३ वर्षांखाली राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत त्याने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याला संधी देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com