Team India: टीम इंडियातून डच्चू दिल्यानंतर स्टार खेळाडूला कॅमेऱ्यासमोर कोसळले रडू, केला मोठा खुलासा

Team India | shikha pandey
Team India | shikha pandey

Team India Shikha Pandey : बांगलादेश दौऱ्यावरील मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची काही दिवासांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. ज्यामध्ये अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा पांडेचे नाव नव्हते. भारतीय संघाचे वेळापत्रक अतिशय व्यस्त असणार असून त्यात पांडेचे नाव नसल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.

शिखा पांडे ही भारतातील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. तिने दिल्ली कॅपिटल्ससोबत डब्ल्यूपीएल उद्घाटनाचा हंगाम चांगला गाजवला होता. दिल्ली कॅपिटल्स संघ या हंगामात उपविजेता ठरला होता. यासोबत शिखा पांडे त्या संघाची सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली. तसे शिखा पांडेला विनाकारण भारतीय संघातून वगळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याला कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय संघातून वगळण्यात आले होते.

Team India | shikha pandey
Tamim Iqbal Retires : वर्ल्ड कपपूर्वी बांगलादेश क्रिकेटमध्ये मोठा भूकंप! कर्णधाराला 'रडत' घ्यावी लागली निवृत्ती

या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी-20 विश्वचषकासाठी उजव्या हाताची वेगवान गोलंदाज भारतीय संघात परतली होती. यानंतर शिखा पांडेला केंद्रीय करारातून वगळण्यात आले. आता बांगलादेशमध्ये होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी शिखा पांडेची भारतीय संघात निवड झाली नाही.

Team India | shikha pandey
Rinku Singh Team India T20 Squad : वाईट दिवस... रिंकूला डावलले, खास मित्र स्टेटस ठेवत म्हणाला...

शिखा पांडे माजी मुख्य प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमन यांना स्पोर्ट्सस्टारला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की, तुम्ही करत असलेल्या मेहनतीचे फळ मिळाले नाही तर अवघड वाटते. मला खात्री आहे की माझी निवड न करण्यामागे काही कारण असेल, पण मला माहित नाही. मेहनत माझ्या हातात आहे आणि मी करत राहिले. जोपर्यंत मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे तोपर्यंत मी मेहनत करेल.

Team India | shikha pandey
Ind vs Wi Virat Kohli : तोच चेंडू, तीच चूक! सराव सामन्यातही कोहली खाली मुंडी घालून..., Video व्हायरल

शिखा पांडे मेंटॉरच्या भूमिकेवर काय म्हणाली

शिखा पांडेने 120 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. शिखा पांडेची 2022 च्या विश्वचषक स्पर्धेत निवड झाली नव्हती, या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत पांडे भारतीय संघाची भाग होती. शिखा पांडेनी कठीण काळात चांगल्या मार्गदर्शकांचे महत्त्व सांगितले आणि डब्ल्यूव्ही रमण यांचे आभारही मानले.

Team India | shikha pandey
Ind vs Wi : 'आमचे सध्याचे कोच राहुल भाई...' वेस्ट इंडिज दौऱ्यापुर्वी अश्विनने केलं मोठे वक्तव्य

पांडे पुढे म्हणाली की, जेव्हा मला संघातून वगळण्यात आले तेव्हा मला वाटले की क्रिकेटपासून दूर राहणेच योग्य आहे. तेव्हा सल्ला देण्यात आला की तुला स्वतःला वेळ देण्याची गरज आहे. माझ्यात बरंच क्रिकेट उरली आहे. जोपर्यंत मी खेळण्याचा आनंद घेत आहे तोपर्यंत मी खेळत राहिले. या क्षणी मी नाराज आहे, परंतु मला ज्या परिस्थितीत टाकले आहे, यातून कसे बाहेर पडायचे हे माझ्या हातात आहे. शिखा पांडे या वर्षी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन करेल अशी आशा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com