esakal | VIDEO : रागावलेल्या DK समोर धवनने टेकले गुडघे!

बोलून बातमी शोधा

Dinesh Karthik and Shikhar Dhavan
VIDEO : रागावलेल्या DK समोर धवनने टेकले गुडघे!
sakal_logo
By
सुशांत जाधव

इंडियन प्रिमियर लीगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोधात खेळलेले आणि एकमेकांसोबत खेळलेले गडी एकमेकांच्या विरोधात आपली क्षमता सिद्ध करताना पाहायला मिळते. कोलकाता नाईट रायडर्समध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चा विकेट किपर दिनेश कार्तिक आणि दिल्ली कॅपिटल्सचा (DC) ओपनर शिखर धवन यांच्यात एक जबऱ्या सीन पाहायला मिळाला. गुरुवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिल्ली आणि कोलकाता यांच्यात रंगत झाली. कोलकाताने पहिल्यांदा बॅटिंग करताना 6 गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित 20 ओव्हरमध्ये 54 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना शिखर धवन आणि पृथ्वी शॉने दिल्ली कॅपिटल्सच्या डावाला सुरुवात केली.

हेही वाचा: IPL 2021 : मोदी स्टेडियमवर दिल्लीकरांचा रुबाब!

दिल्लीच्या ओपनिंग पेयर्सने पहिल्या विकेटसाठी 132 धावा कुटल्या. ही जोडी फोडण्यासाठी कोलकाताच्या गोलंदाजांना अपयश येत असताना विकेटमागे उभारलेल्या दिनेश कार्तिक आणि शिखर धवन यांच्यातील एक प्रसंग चर्चेचा विषय ठरत आहे. शिखर धवनला गोलंदाजाने चकवा दिल्यानंतर विकेट मागे दिनेश कार्तिकने दांड्या उडवल्या. त्यानंतर धवनकडे रागाने पाहत DK ने जोरदार अपील केली. यावेळी शिखर धवनने शेरास सव्वा शेर असल्याचे दाखवत गुडघ्यावर बसून दिनेश कार्तिकच्या नजरेला नजर भिडवल्याचे पाहायला मिळाले. या दोघांमधील या प्रसंगाने टीव्हीवर सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांचे मनोरंजन झालेच. त्यानंतर याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक लोक याला पसंती देत आहेत.

हेही वाचा: सूर्या तिला नेमकं काय सांगतोय? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

क्रिकेटच्या मैदानातील आपल्या दमदार कामगिरीशिवाय धवन आपल्या नौटंकी ड्रामामुळे चांगलाच चर्चेत असतो. कॅच घेतल्यानंतर पैलवानगिरी स्टाईलमध्ये शड्डू ठोकणे ही त्याची स्टाईल स्टेटमेंटच झालीये. त्यानंतर कोलकाताच्या सामन्याविरुद्ध त्याने दिनेश कार्तिकची मजा घेतल्याचे पाहायला मिळाले. दोघांच्यातील ही नौटंकी चांगलीच मनोरंजन करणारी ठरत आहे. कोलकाताच्या संघाला या सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. शिखर धवनने 47 चेंडूत 45 धावांची खेळी केली होती. कमिन्सने त्याला पायचित स्वरुपात बाद केले.