VIDEO: शिखर धवनने जोरावरला दोन वर्षांनी पाहिले अन् ...

Shikhar Dhawan Posted emotional video of his son Zoravar meeting after 2 years
Shikhar Dhawan Posted emotional video of his son Zoravar meeting after 2 yearsesakal

भारताचा सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शिखर धवन आपल्या मुलाला, झोरावरला (Zoravar) विमानतळावर भेटतानाचा आहे. शिखर धवन आपल्या मुलाला तब्बल दोन वर्षानंतर भेटत आहे. शिखर धवन आणि आयशा मुखर्जी (Aesha Mukerji) हे विभक्त झाले आहेत. कोरोनाच्या प्रोटोकॉलमुळे शिखर धवन आपल्या मुलाला जवळपास दोन वर्षे भेटू शकला नव्हता. जेव्हा कोरोनाचे निर्बंध शिथील झाले तेव्हा शिखर धवनला आपल्या मुलाला भेटण्याची संधी मिळाली. (Shikhar Dhawan Posted emotional video of his son Zoravar meeting after 2 years)

Shikhar Dhawan Posted emotional video of his son Zoravar meeting after 2 years
पत्रकाराच्या धमकीवरून वृद्धीमान साहाचा बीसीसीआयला ठेंगा

ज्यावेळी शिखर धवन दोन वर्षानंतर झोरावरला भेटला त्यावेळी त्याने त्याला उचलून घेतले. मुलानेही आपल्या वडिलांना मिठी मारली. शिखर धवनने या व्हिडिओ शेअर करताना म्हणतो की, 'मला माझ्या मुलाला भेटून दोन वर्षे झाली. त्याच्यासोबत खेळणे, त्याला मिठी मारणे, त्याच्याशी गप्पा मारणे... हा खूप भावूक क्षण आहे. हा क्षण असा आहे जो कायम आठवणीत राहणार आहे.'

Shikhar Dhawan Posted emotional video of his son Zoravar meeting after 2 years
विक्रमादित्य सचिनकडून प्रज्ञानंदाच तोंडभरुन कौतुक

शिखर धवन आणि आयशा (Shikhar Dhawan and Aesha Mukerji) यांनी 2012 मध्ये लग्न केले होते. आयशाला पहिल्या दोन मुली देखील आहेत. मात्र शिखर आणि आयशाचा घटस्फोट झाल्यानंतर शिखर आणि आयशाचा मुलगा झोरावर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाला (Australia) गेले होते. त्यानंतर आता कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यानंतर तो भारतात परतला आहे. बाप लेकाची दोन वर्षानंतर झालेली भेट पाहून चाहते देखील भावूक झाले.

श्रीलंकेविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी शिखर धवनला ब्रेक देण्यात आला आहे. आता शिखर धवन थेट आयपीएलमध्ये (IPL 2022) खेळताना दिसणार आहे. विशेष म्हणजे शिखर धवनला पंजाब किंग्जने 8.25 कोटी रूपयाला खरेदी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com