
'मी माझ्या प्रवासाचा आनंद घेतोय, बाकी निर्णय निवडसमितीला घ्यायचायं'
भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) हा भारतीय संघातील एक अनुभवी फलंदाज आहे. मात्र भारतीय वनडे संघातील (Team India) सलामीवीराला टी 20 (T20I) संघात मात्र स्थान राखण्यात अपयश येत आहे. त्याला गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्येही भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यापासून तो भारतीय संघाकडून टी 20 सामना खेळलेला नाही. (Shikhar Dhawan Statement About Selection in Team India)
हेही वाचा: दिल्लीत शारापोवा, शुमाकर विरूद्ध का झाला गुन्हा दाखल?
या बाबत शिखर धवनने एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, संघात घेणे न घेणे हा सर्वस्वी निवडसमितीचा (Selection Committee) निर्णय आहे. तो म्हणाला, 'जर तुम्ही चांगली कामगिरी करत असाल तर तुमच्यासाठी कायम दरवाजे उघडे असतात. निर्णय हा निवडसमितीने घ्यायचा आहे. मी माझ्या प्रवासाचा आनंद घेत आहे. मी चांगली कामगिरी करत आहे. मी माझ्या क्रिकेटचा आनंद घेत आहे.' शिखर धवनने नुकतीच आपली शिखर धवन फाऊंडेशन (Shikhar Dhawan Foundation) स्थापन केले आहे. आयपीएल 2022 च्या लिलावात शिखर धवनला पंजाब किंग्जने 8.25 कोटी रूपयांना खरेदी केले आहे.
हेही वाचा: ..तर भारताचे लोक तुला जिवंत जाळतील; शोएबने सांगितला 'तो' किस्सा
यंदा पंजाब किंग्जकडून (Punjab Kings) खेळणाऱ्या शिखर धवनने फेब्रुवारी महिन्यात वेस्ट इंडीज विरूद्धच्या मालिकेत शेवटचा वनडे सामना खेळला होता. ही मालिका भारताने 3-0 ने जिंकत विंडीजला व्हाईट वॉश दिला होता. याचबरोबर धवन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्याला विंडीज विरूद्धच्या मालिकेतील सामना मुकला होता. शिखर धवनने भारताकडून 149 वनडे सामने खेळले असून त्यात 6284 धावा केल्या आहेत. तर टी 20 मध्ये 68 सामन्यात 1759 आणि 34 कसोटी सामन्यात 2315 धावा केल्या आहेत.
Web Title: Shikhar Dhawan Statement About Selection In Team India For T20
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..