शिखर धवन संघासोबतच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जून 2019

सलामीचा फलंदाज शिखर धवनच्या अंगठ्याला फ्रॅक्‍टर निष्पन्न झाल्यामुळे त्याचा स्पर्धेतील सहभाग संदिग्ध मानला जात आहे. त्याला तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

मुंबई : सलामीचा फलंदाज शिखर धवनच्या अंगठ्याला फ्रॅक्‍टर निष्पन्न झाल्यामुळे त्याचा स्पर्धेतील सहभाग संदिग्ध मानला जात आहे. त्याला तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

यानंतरही "बीसीसीआय'ने शिखरला इंग्लंडमध्येच थांबण्याच्या सूचना केल्या आहेत. तेथेच त्याच्यावर उपचार केले जातील. धवनच्या दुखापतीच्या बातमीनंतर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांना बदली खेळाडू म्हणन पाठविण्याच्या चर्चेला वेग आला होता. मात्र, अजून तरी कुठल्याही बदली खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shikhar Dhawan Still is in Team India