World Cup 2019 : निरोप घेताना धवनचा संदेश; शो मस्ट गो ऑन

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जून 2019

लंडन : आयसीसीच्या जागतिक स्पर्धांतील धडाकेबाज फॉर्मची मालिका कायम राखल्यानंतर भारताचा डावखुरा सलामीवीर यशोमालिका उंचावण्यास आतुर होता, पण त्याच्या मार्गात दुखापतीचा अडथळा आहे. संघाचा निरोप घेण्यापूर्वी त्याने भावपूर्ण संदेश दिला आहे. दिमाखदार कामगिरीची कमान उंचावत न्यावी, असा संदेश त्याने दिला.

धवनने ट्‌वीट केले आहे, त्याने म्हटले आहे की, विश्वकरंडक स्पर्धेचा यापुढे घटक उरणार नाही हे जाहीर करताना मी भावुक झालो आहे. दुर्दैवाने अंगठ्याच्या दुखापतीमधून मी वेळेत बरा होऊ शकणार नाही, पण "शो मस्ट गो ऑन'. संघातील सहकारी, क्रिकेटप्रेमी आणि आपल्या साऱ्या देशाचे प्रेम आणि पाठिंबा मिळाल्याबद्दल मी ऋणी आहे.धवनने "जय हिंद!' असे म्हणत ट्‌वीटद्वारे निरोप घेताना देशप्रेम व्यक्त केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shikhar dhawan takes a good bye