नीरज चोप्राच्या यशानंतर भारताच्या भालाफेकीतील भविष्य उज्वल दिसत आहे. महाराष्ट्राच्या शिवम लोहकरेने ८४.३१ मीटर भाला फेकून नीरजचा विक्रम मोडला. नीरजनेही शिवमला शाबासकी दिली आहे..नीरज चोप्राने आत्तापर्यंत भारताला भालाफेकीमध्ये मोठे यश मिळवून दिले आहे. त्याने अनेक मोठी पदके जिंकली असून टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकालाही गवसणी घातली. त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. त्याच्या यशानंतर भारताचे भालाफेकीतील भविष्य उज्वल दिसत असून वेगवेगळ्या भागातील खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. नुकतेच महाराष्ट्राच्या अहमदनगरमधील सोनाई गावातील शिवम लोहकरे याने नीरजचाच विक्रम मोडला आहे..Neeraj Chopra: 'गोल्डन बॉय' नीरजने जिंकली OSTRAVA GOLDEN SPIKE 2025 स्पर्धा; ८५.२९ मीटर फेकला भाला, तरीही निराश....नुकतीच ७४ वी इंटर सर्व्हिस ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप २०२५ स्पर्धेत २० वर्षीय शिवमने ८४.३१ मीटर लांब भाला फेकला. त्यामुळे त्याने नीरजने २०१८ मध्ये नोंदवलेल्या विक्रमाला मोडले. नीरजने २०१८ मध्ये ८३.८० मीटर लांब भाला फेकला होता. शिवमने सर्वात लांब भाला फेकणारा युवा भारतीय खेळाडू ठरला आहे..दरम्यान शिवमने सलग चौथ्यांदा ८० मीटरचे अंतर पार केले आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच पुण्यात इंडियन ओपन ऍथलेटिक्स मीटमध्ये ८०.९५ मीटर लांब भाला फेकला होता. लहान वयातच ८० मीटरचं अंतर तो सातत्यान पार करत असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे..मात्र विक्रमाची होणार नाही नोंददरम्यान शिवमने जरी ८४.३१ मीटर लांब भाला फेकला असला तरी अधिकृतरित्या त्याची नोंद वर्ल्ड ऍथलेटिक्समध्ये होणार नाही. कारण या स्पर्धेला अधिकृत मान्यता नाही. पण तरी शिवमने केलेल्या या कामगिरीमुळे सर्वत्र मोठी दाद मिळाली आहे..Neeraj Chopra: डायमंड लीग अंतिम फेरीमध्ये टायमिंग अन् रनअप सर्वच चुकले; दुसऱ्या स्थानावर घसरण झाल्यानंतर नीरज चोप्राची कबुली.नीरजकडूनही मिळाली शाबासकीशिवमने त्याच्या ८४.३१ मीटर फेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर नीरजने स्वत: कमेंट केली आहे. त्याने लिहिले की 'शिवम अभिनंदन. खूप मस्त. अशीच कामगिरी करत राहा.' आता शिवमकडून यापुढेही मोठ्या अपेक्षा असणार आहेत..FAQsप्र.१: शिवम लोहकरे कोण आहे?(Who is Shivam Lohakare?)उ. शिवम लोहकरे हा अहमदनगर, महाराष्ट्रचा युवा भालाफेकपटू आहे.प्र.२: शिवमने किती लांब भाला फेकला?(How far did Shivam Lohakare throw the javelin?)उ. शिवमने ८४.३१ मीटर लांब भाला फेकला.प्र.३: शिवमने कोणाचा विक्रम मोडला?(Whose record did Shivam break?)उ. त्याने नीरज चोप्राने २०१८ मध्ये केलेल्या ८३.८० मीटर फेकीचा विक्रम मोडला.प्र.४: हा विक्रम अधिकृत मानला जाईल का?(Will this record be officially recognized?)उ. नाही, कारण स्पर्धेला वर्ल्ड ऍथलेटिक्सकडून अधिकृत मान्यता नाही.प्र.५: नीरज चोप्राने या कामगिरीवर काय प्रतिक्रिया दिली?(What was Neeraj Chopra’s reaction to Shivam’s throw?)उ. नीरजने सोशल मीडियावर कमेंट करत शिवमचे अभिनंदन केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.