Shoaib Akhtar : पराभव भारताचा शोककळा पाकिस्तानात; अख्तर म्हणाला, "भारताने.." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shoaib akhtar

Shoaib Akhtar : पराभव भारताचा शोककळा पाकिस्तानात; अख्तर म्हणाला, "भारताने.."

IND vs SA Shoaib Akhtar : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये रविवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. या पराभवाचा सर्वाधिक फटका पाकिस्तानला बसला. या निकालामुळे पाकिस्तान संघ 2022 च्या टी-20 विश्वचषकातून बाहेर होण्याच्या मार्गावर पोहोचला आहे. अशा स्थितीत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भारताने पाकिस्तान संघाला संपवले, असे म्हटले आहे.

हेही वाचा: T20WC : ऑस्ट्रेलियाच्या विजयाने इंग्लंडची गोची, आयर्लंडला हरवून पॉइंट टेबलमध्ये...

शोएब अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, 'भारताने आम्हाला संपवले आहे, यात भारताचाही दोष नाही. आम्ही खूप वाईट खेळलो. पण भारतानेही आमची निराशा केली. भारतीय फलंदाजांनी थोडा धीर धरला असता, तर 150 ही धावसंख्या येथे विजयी ठरली असती. तसे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू खूप चांगले खेळले आहे.

हेही वाचा: Dinesh Karthik : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये ऋषभ पंतची ग्रँड एन्ट्री ?

टी-20 विश्वचषकात 2022 मध्ये पाकिस्तानचा टीम इंडियाविरुद्ध पहिला पराभव झाला. यानंतर झिम्बाब्वेने त्याला एका धावेने हरवून सर्वात मोठा धक्का दिला. त्यांच्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तान संघाने नेदरलँड्सचा पराभव करून नक्कीच विजय मिळवला, पण या संघाची खास नजर भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यावर होती.

दक्षिण आफ्रिकेने येथे विजय मिळवला असता आणि पुढच्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचाही पराभव केला असता, तर पाकिस्तान संघाला उपांत्य फेरी गाठण्याची पूर्ण शक्यता होती. तरीही पाकिस्तान संघ उपांत्य फेरी गाठू शकतो, पण त्यासाठी मोठा अपसेट लागेल, जे खूप कठीण आहे.