shoaib akhtar statement about danish kaneria and pakistan team behavior
shoaib akhtar statement about danish kaneria and pakistan team behavior

हिंदू असल्यानं पाक खेळाडू करायचे कनेरियाचा अपमान; अख्तरचा धक्कादायक खुलासा

लाहोर : लेगस्पिनर दानिश कनेरिया हिंदू असल्यामुळे पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंनी त्याला नेहमीच अयोग्य पद्धतीने वागविले, असा खळबळजनक आरोप वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने केला. अनिल दलपत याच्यानंतर कनेरिया हा पाककडून खेळलेला दुसराच हिंदू होता. 

"गेम ऑन है' या कार्यक्रमात अख्तर म्हणाला की, अद्वितीय कामगिरीचे श्रेय कनेरियाला कधीच मिळाले नाही. असे व्हायला नको होते. 2005 मध्ये त्याने इंग्लंडमध्ये आम्हाला कसोटी मालिका जिंकून दिली. त्याने प्रमुख फलंदाजांना बाद केले होते. प्रांत किंवा धर्मावरून कुणी भेद केला तर मी संतप्त व्हायचो. पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या हिंदूला देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार आहे. त्या हिंदूने आपल्याला मालिका जिंकून दिली तेव्हा मी संघातील सहकाऱ्यांना त्याला तसे वागविल्याबद्दल खडसावले होते.' 
कनेरियावर स्पॉट-फिक्‍सींगमध्ये सामील असल्याचा आरोप झाला. त्यामुळे इंग्लंड मंडळाने त्याच्यावर बंदी घातली. त्याने आव्हान दिले होते, पण ते 2013 मध्ये फेटाळले गेले. 

कनेरियाला जेवणही वेगळ्या टेबलवरून घ्यावे लागायचे. तो आमच्याबरोबर खाऊ लागला तर कर्णधार भुवई उंचवायचे. त्यावर मी आक्षेप घ्यायचो. तू कर्णधार असलास तरी तुझे वर्तन तिरस्करणीय आहेत. हा युवक (कनेरिया) आपल्यासाठी इतक्‍या विकेट घेतोय. सामने जिंकून देतोय आणि तू त्याला असे वागवितोस असे मी म्हणायचो.
- शोएब अख्तर, पाकचा माजी कसोटीपटू 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com