Virat Kohli : एकप्रकारे देव त्याला सांगत होता... भारत - पाक सामन्याच्या पार्श्वभूमीवर शोएब विराटबद्दल काय म्हणाला?

Virat Kohli Shoaib Akhtar
Virat Kohli Shoaib Akhtaresakal

Virat Kohli Shoaib Akhtar : येत्या काही महिन्यात भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडणार आहेत. त्यामुळे या हाय व्होल्टेज सामन्यांची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. गेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांना भिडले होते. हा सामना विराट कोहलीने एकहाती जिंकून दिला होता.

विराट कोहलीने पाकिस्तानचा सर्वात वेगवान गोलंदाज हारिस रौफला दोन षटकार लगावत आपण पुन्हा एकदा आपल्या प्राईम टचमध्ये परत आलो असल्याची घोषणा केली. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने विराट कोहलीबद्दल एक वक्तव्य केलं आहे.

Virat Kohli Shoaib Akhtar
Rahkeem Cornwall Run Out : इतका निवांतपणा बरा नाही! क्रिकेटच्या इतिहासात असा रन आऊट कधी झाला नाही

मेलबर्नमध्ये झालेल्या भारत - पाकिस्तान सामन्याचा संदर्भ देत शोएब अख्तर म्हणाला, 'तो सामना पूर्णपणे विराट कोहलीचा होता. क्रिकेटच्या देवाची त्याच्यावर कृपा होती. तो चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. तुम्ही भारतीय चाहते त्याच्यावर टीका करत होता. माध्यमेही त्याच्यावर तुटून पडली होती.'

'देवाने एकप्रकारे त्याला सांगितले की, हे तुझे व्यासपीठ आहे. ये आणि पुन्हा क्रिकेटचा किंग हो. तुम्ही पाहिले तर तो पाऊस, 1 लाख लोकं 130 कोटी भारतीय, 30 कोटी पाकिस्तानी सामना पाहत होते. सर्व कोहलीसाठी सेट झाले होते. ज्यावेळी तुम्ही हारिस रौफला दोन षटकार मारता. माला वाटतं की त्या दिवशी सर्व गोष्टी विराट कोहलीसाठी जुळून आल्या होत्या.'

शोएब अख्तर पुढे म्हणाला की, 'विराट कोहली वनडे वर्ल्डकपनंतर मर्यादित षटकांचे सामने खेळेल असे मला वाटत नाही. मला वाटतं की विराट कोहली अजून सहा वर्षे तरी खेळले आणि सचिन तेंडुलकरचे 100 शतकांचे रेकॉर्ड मोडेल. विराट कोहलीकडे ते रोकॉर्ड मोडण्याची क्षमता आहे. त्याने वर्ल्डकपनंतर कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायला हवं.'

Virat Kohli Shoaib Akhtar
Gautam Gambhir : गंभीरची होणार घरवापसी; लखनौ सुपर जायंट्सला देणार सोडचिठ्ठी?

विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर त्याला फलंदाजीत फारसं यश मिळालं नाही. गेल्या वर्षभरापासून त्याची बॅट शांत होती. मात्र त्याने आपला फॉर्म पुन्हा मिळवला. अख्तरला मात्र कर्णधारपद गेल्याचा त्याच्यावर फार नकारात्मक परिणाम झाला असं वाटत नाही. अख्तरच्या मते विराट कर्णधारपद गेल्यानंतर जास्त रिलॅक्स झाला.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com