पाक क्रिकेटपटूंना अख्तरचा सल्ला, ''त्या विराटकडून शिका जरा''

वृत्तसंस्था
Tuesday, 24 December 2019

आमच्या क्रिकेटने भारतीय क्रिकेटचे अनुकरण करावे. याशिवाय विराटकडूनही शिकावे. भारतीय क्रिकेटची प्रगती झाल्याचे मला दिसते. आपण पूर्वी आक्रमक खेळायचो आणि झुंज देण्यास सज्ज असायचो. आपल्या कर्णधाराची भारतीय कर्णधाराबरोबर तुलना करुयात.

लाहोर : रावळपिंडी एक्सप्रेस अर्थात शोएब अख्तर याने पाक क्रिकेटला खडे बोल सुनावले आहेत. पूर्वी आक्रमकता हाच आपला स्थायीभाव होता, आपण भित्रे नव्हतो, असे सनसनाटी वक्तव्य त्याने केले. त्याने विराटच्या कार्यशैलीची तुलना पाकचे जगज्जेते कर्णधार इम्रान खान यांच्याशी केली. 
विद्यमान कर्णधार अझर अली आणि प्रशिक्षक मिस्बा उल हक यांना त्याने सल्ला नव्हे तर मंत्रही दिला. कोहली याच्याप्रमाणे नेतृत्व करावे आणि त्याच्या विराट सेनेपेक्षा सरस ठरण्याचे ध्येय बाळगावे असे त्याने विद्यमान कर्णधार अझर अली आणि प्रशिक्षक मिस्बा उल हक यांना उद्देशून सांगितले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपल्या यु-ट्युब चॅनेलवर अख्तरने व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने म्हटले आहे की, आमच्या क्रिकेटने भारतीय क्रिकेटचे अनुकरण करावे. याशिवाय विराटकडूनही शिकावे. भारतीय क्रिकेटची प्रगती झाल्याचे मला दिसते. आपण पूर्वी आक्रमक खेळायचो आणि झुंज देण्यास सज्ज असायचो. आपल्या कर्णधाराची भारतीय कर्णधाराबरोबर तुलना करुयात. मिस्बा आणि अझरने पाक संघ सरस बनविण्याचे मार्ग शोधून काढले पाहिजेत. विराटच्या संघापेक्षा सरस बनण्याचा पथदर्शी प्रकल्प आखला जावा.

ऑस्ट्रेलियाने निवडले संघ अन् कर्णधार चक्क भारतीय, पाहा कोण?

तंदुरुस्तीद्वारे क्रांती
अख्तरने विराटच्या अफाट तंदुरुस्तीचाही उल्लेख केला. त्याने म्हटले आहे की, तंदुरुस्तीबाबत बोलायचे झाले तर विराटने भारतीय संघात क्रांती घडविली आहे. तो फिटनेसचा भोक्ता आहे. या बाबतीत संपूर्ण संघ त्याच्याकडे आद्श म्हणून बघतो. कर्णधार चपळ असेल आणि असे मापदंड निर्माण करीत असेल तर साहजिकच संघ त्याचे अनुकरण करतो.

इम्रानचे उदाहरण
यासंदर्भात अख्तरने इम्रान खान यांचे उदाहरण दिले. तो म्हणाला की, आमच्या संघाची धुरा इम्रानकडे असताना हेच चित्र दिसायचे. ते स्वतःची कामगिरी उंचावण्यासाठी आणि संघ दर्जेदार बनविण्यासाठी कसून प्रयत्न करायचे. मैदानावर येताच ते कुणाकडेही लक्ष द्यायचे नाहीत. आधी धावत मैदानाला दहा फेऱ्या मारायचे. 20-25 स्प्रींट काढायचे. मग तीन तास नेटमध्ये बोलींग करायचे. इतर सर्व खेळाडूंसाठी हे करणे अनिवार्य होते.

INDvsWI : स्वत:लाच सिद्ध करुन दाखवायचं होतं की मी वनडे खेळू शकतो

इम्रान हे काही डावपेचांत वाकबगार असे कर्णधार नव्हते, पण मॅचवीनर्स कोण आहेत हे त्यांना माहित होते. आता भारत सुद्धा हेच करतो आहे. विराटचा दृष्टिकोन बघा, तो किती चुरशीने खेळतो ते बघा. शेवटी खेळाडू कर्णधाराचे अनुकरण करतात. मैदानावर तसेच मैदानाबाहेर खेळाडूंच्या वर्तनाबाबत कडक आचारसंहिता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shoaib Akhtar suggested pakistan team players to learn from Virat Kohli