
उमरान मलिकचे स्पीड पाहून शोएब अख्तरला झोंबली मिर्ची, म्हणाला...
सनराझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक सध्या खूप चर्चेत आहे. त्याने भल्या भल्या फलंदाजाने अडचणीत आणले आहे. त्यानं या हंगामात 150 प्रतितास वेगानं गोलंदाजी केली आहे. त्याची गोलंदाजी पाहून अनेक भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याला भारतीय संघात स्थान मिळावं अशी मागणी करत आहेत. मात्र, पाकिस्तानचा रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा शोएब अख्तरने कुचकट विधान केले आहे. इतक्या वेगाने धावला तर कुठेतर स्वतःची हाडे मोडून घेईल असे विधान अख्तरने केले आहे.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात उमरान मलिकनं 15 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला दक्षिण आफ्रिका मालिकेत संधी मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: मोदी माझ्या काश्मीरी हिंदू बहिणींची व्यथा ऐका; रैनाने शेअर केला Emotional Video
अशातच, स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या मुलाखतीत अख्तरने उमरान मलिकच्या वेगावर भाष्य केले आहे. तो म्हणाला, माझ्या वर्ल्ड रेकॉर्डला 20 वर्षापेक्षा अधिक वर्ष उलटले आहेत. मला माझे चाहते याबद्दल जेव्हा विचारत असतात तेव्हा मला प्रश्न पडतो की हे रेकॉर्ड तोडणारा कोण असेल? उमरानने हे रेकॉर्ड तोडले तर मला याचा आनंदच होईल. असे वक्तव्य केलं. पण त्यानंतर नेहमीप्रमाणे कुचकट बोलण्याची संधी त्याने सोडली नाही.
हेही वाचा: IPL च्या मानधनाने कालवलं जीवलग दिग्गजांच्या मैत्रीत विष
अख्तर म्हणाला, माझे रेकॉर्ड तोडता तोडता उमरान स्वतःची हाडे मोडून घेऊ नये म्हणजे झालं त्यासाठी माझी प्रार्थना आहे. तो फिट रहावा असा त्याचा अर्थ असल्याचे त्याने म्हटले आहे.
तसेच, आयपीएलनंतर टीम इंडिया आयरलँड आणि साउथ अफ्रीका विरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे उमरान आता निवड समितीच्या नजरेत असणार आहे. बीसीसीआयने उमरान मलिकसारख्या वेगवान गोलंदाजांची काळजी घ्यायला हवी असा सल्ला अख्तरने दिला आहे. उमरान मलिकने वर्कलोड अधिक असणार नाही हे निश्चित केले पाहिजे. असा कानमंत्रही अख्तरने यावेळी मलिकला दिला आहे.
रावळपिंडी एक्सप्रेसच्या नावावर 161.3 प्रतितास वेगानं बॉल फेकण्याच रेकॉर्ड आहे. तर यंदाच्या सीझनमध्ये उमरानने आयपीएलमध्ये 157 प्रतितास वेगानं बॉल फेकला आहे. जी आयपीएलमधील दुसरी वेगवान गोलंदाजी होती.
Web Title: Shoaib Akhtar Wants Srh Youngster To Break His 1613 Kmph Bowling Speed Record
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..