Shoaib Malik : शोएबचा मोठा कारनामा! अशी कामगिरी करणारा ठरला आशियातील पहिला क्रिकेटपटू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shoaib Malik T20 Record

Shoaib Malik : शोएबचा मोठा कारनामा! अशी कामगिरी करणारा ठरला आशियातील पहिला क्रिकेटपटू

Shoaib Malik T20 Record : पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक सध्या कौटुंबिक कलहामुळे चर्चेत आला होता. त्याचा आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाचा संसार मोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशा सर्व नकारात्मक चर्चांच्या वातावरणात शोएब मलिकने टी 20 क्रिकेटमध्ये मोठा धमाका केला. सध्या शोएब मलिक जाफनामध्ये लंका प्रीमियर लीग खेळत आहे. या टी 20 लीगमध्ये 12 डिसेंबरला कोलंबो स्टार्सविरूद्धच्या सामन्यात मलिकने आपल्या टी 20 कारकिर्दितील 12000 धावा पूर्ण केल्या.

हेही वाचा: Rohit Sharma : रोहित नसल्यामुळे राहुल द्रविडचे काम सोपे झाले... कैफने केले मोठे वक्तव्य

लंका प्रीमियर लीगमध्ये जाफना किंग्सकडून खेळणाऱ्या शोएब मलिकने कोलंबो स्टार्सविरूद्ध खेळताना मलिकने कारकिर्दितील 12000 टी 20 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा तर आशिया खंडातील पहिला खेळाडू ठरला. यापूर्वी अशी कामगिरी वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलने केली आहे. त्याने टी 20 कारकिर्दित 14,562 धावा केल्या आहेत. दरम्यान, आशिया खंडातील टी 20 क्रिकेटमध्ये 12000 धावा पूर्ण करणारा शोएब मलिक हा पहिला क्रिकेटपटू ठरल्यानंतर सोशल मीडियावर त्याने पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा: PAK vs ENG Test Series: पाकिस्तानसाठी वाईट बातमी! ICC ने रावळपिंडीच्या खेळपट्टीवर...

कोलंबो स्टार्स आणि जाफना किंग्ज यांच्यातील सामन्याबाबत बोलायचे झाले तर जाफना किंग्जने 20 षटकात 5 बाद 178 धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात कोलंबो स्टार्सला 20 षटकात 8 विकेट्स गमावून 172 धावाच करता आल्या. जाफना किंग्जने 6 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, सामन्यात नाबाद 35 धावा करणाऱ्या शोएब मलिकला नकुत्याच झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघात स्थान देण्यात आले नव्हते. यावरून पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी प्रचंड टीका केली होती. शोएब मलिक देखील नाराज झाला होता.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....