Brazilian footballer Jacy Maranhao suffered a shocking fall into the players’ tunnel
esakal
Jacy Maranhao falls into players tunnel during goal celebration: नुकताच फुटबॉल वर्ल्ड कप संपला अन् स्पेनने जेतेपदाचा ताज नावावर केला... माजी वर्ल्ड कप विजेत्या ब्राझिलला पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला. फुटबॉलची ही मोठी स्पर्धा संपली असली तरी त्याचा ज्वर अजून कमी झालेला नाही. इंग्लिश प्रीमिअर लीग, बुंदेसलीगा, ला लिगा आदी स्पर्धा सुरू आहेत आणि जगभरातील चाहते या लीग आवर्जुन पाहत आहेत. या खेळाशी प्रेक्षकांचे नाते घट्ट झालेले अनेकदा पाहायला मिळाले आहे आणि खेळाडूही गोल केल्यानंतर या चाहत्यांसमोर आपला आनंद साजरा करण्यासाठी त्यांच्या दिशेने पळताना दिसतात. पण, हे सेलिब्रेशन ब्राझिलच्या एका खेळाडूच्या जीवावर बेतले असते...