India at Shooting World Cup 2025
esakal
India at Shooting World Cup 2025 : भारताच्या मेघना सज्जनर हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात ब्राँझपदक पटकावले. भारतीय नेमबाजांना चीनमधील निंगबो येथील विश्वकरंडकात दोन पदके पटकावता आली. याआधी इशा सिंगने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. दोन पदकांसह भारत पदकतालिकेत पाचव्या स्थानी राहिला. चीनच्या संघाने आठ पदकांसह पहिल्या स्थानावर मुसंडी मारली.