Shreyas Iyer Hundred | IND vs NZ: पहिल्याच कसोटीत शतक ठोकणारा श्रेयस १६वा भारतीय.. पाहा यादी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shreyas-Iyer-List-Indians

श्रेयसने सेहवाग, रोहित, गांगुलीच्या पंगतीत मिळवलं स्थान

पहिल्याच कसोटीत शतक ठोकणारा श्रेयस १६वा भारतीय.. पाहा यादी

sakal_logo
By
विराज भागवत

IND vs NZ, 1st Test : श्रेयस अय्यरचे शतक (१०५) आणि त्याला शुबमन गिल (५०) व रविंद्र जाडेजा (५०) या दोघांनी दिलेल्या साथीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३४५ धावांपर्यंत मजल मारली. मुंबईकर श्रेयस अय्यरने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतक ठोकलं. त्याने १७१ चेंडूत १०५ धावांची खेळी केली. १३ चौकार आणि २ षटकारांनी त्याने स्वत:ची खेळी सजवली. पदार्पणाच्या कसोटीत शतक ठोकणारा श्रेयस अय्यर १६वा फलंदाज ठरला. तसेच, भारतीय भूमीवर हा पराक्रम करणारा श्रेयस १०वा खेळाडू ठरला. त्या निमित्ताने पाहूया पदार्पणात शतक ठोकणारे भारतीय फलंदाज...

हेही वाचा: IND vs NZ 1st Test : टीम इंडियाचा पहिला डाव 345 धावांत आटोपला, पण...

पदार्पणात शतक ठोकणारे भारतीय फलंदाज...

१. लाला अमरनाथ - १९३३

२. दीपक शोधन - १९५२

३. एजी कृपाल सिंग - १९५५

४. अब्बास अली बेग - १९५९

५. हनुमंत सिंग - १९६४

६. गुंडप्पा विश्वनाथ - १९६९

७. सुरिंदर अमरनाथ - १९७६

८. मोहम्मद अझरूद्दीन - १९८५

९. प्रवीण अमरे - १९९२

१०. सौरव गांगुली - १९९६

११. विरेंद्र सेहवाग - २००१

१२. सुरेश रैना - २०१०

१३. शिखर धवन - २०१३

१४. रोहित शर्मा - २०१३

१५. पृथ्वी शॉ - २०१८

१६. श्रेयस अय्यर - २०२१

हेही वाचा: IND vs NZ Test: श्रेयसला संघात स्थान; रिकी पॉन्टींग म्हणतो...

दरम्यान, या यादीतील अब्बास अली बेग, सुरिंदर अमरनाथ, प्रवीण अमरे, सौरव गांगुली, विरेंद्र सेहवाग आणि सुरेश रैना या फलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांची जमिनीवर पदार्पणाची कसोटी खेळत शतक झळकावण्याचा पराक्रम केला.

loading image
go to top