IND vs NZ 1st Test : टीम इंडियाचा पहिला डाव 345 धावांत आटोपला, पण...

IND vs NZ
IND vs NZTwitter

India vs New Zealand 1st Test Day 2 : कानपूरच्या कसोटी सामन्यात पदार्पणात शतकी खेळी करणाऱ्या श्रयस अय्यरच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 345 धावा केल्या आहेत. अय्यरशिवाय शुबमन गिल 52 (93) आणि जाडेजा 50 (112) या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. त्याच्याशिवाय रविचंद्रन अश्विनने 38 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून टिम साउदीनं सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. कायले जेमिसनला 3 तर फिरकीपटू अजाझ पटेलनंही 2 विकेट घेतल्या. भारतीय संघाचा डाव साडे तीनशेच्या आत आटोपला असला तरी पहिला डाव संपताना टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे.

IND vs NZ
IND vs NZ 1st Test Day 2 : साउदीचा पंजा; टीम इंडिया 300 पार...

कारण पहिल्या दिवसाच्या सत्रातील जेमिसनचा मारा आणि दुसऱ्या दिवसातील पहिले सत्र टिम साउदीनं गाजवल्यानंतर फिरकीपटू अजाझ पटेलला दोन विकेट मिळाल्या. भारतीय संघ या सामन्यात जाडेजा, अश्विन आणि अक्षर पटेल या तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरला आहे. त्यामुळे डाव संपता संपता फिरकीलाही खेळपट्टी साथ देत असल्याचे संकेत मिळाले. खेळपट्टीवर फिरकीची जादू पाहायला मिळाली तर न्यूझीलंडच्या अडचणी नश्चितच वाढतील. ही गोष्ट भारतीय संघासाठी जमेची बाजू ठरेल.

IND vs NZ
गावसकरांचा आशीर्वाद अन् अय्यरनं पदार्पणात ठोकलं शतक

भारतीय संघाचा कार्यवाहू कर्णधार अजिंक्य रहाणेनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर पहिल्या दिवशी सलामीवीर शुबमन गिलने अर्धशतकी खेळी केली. पुजारा 26 (88) आणि रहाणे 35 (63) स्वस्तात माघारी परतल्यानंतर अय्यर आणि जाडेजाने पाचव्या विकेटसाठी 121 धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवसाच्या खेळात जाडेजाला एकही धाव करता आली नाही. तो साउदीने त्याला डावाच्या सुरुवातील बाद केले. त्याने 112 चेंडूत 50 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यर 171 चेंडूत 105 धावा करुन माघारी फिरला. त्याची विकेटही साउदीनंच घेतली. तळाच्या फलंदाजीत अश्विनने 56 चेंडूचा सामना करताना 5 चौकाराच्या मदतीने संघासाठी 38 धावांचे योगदान दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com