यालाच म्हणतात स्वतःच्या पायावर कुह्राड मारणे! श्रेयस देखील राहुल, पांड्याच्या पंक्तीत| Shreyas Iyer VIDEO | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ Shreyas Iyer Hit Wicket

Shreyas Iyer VIDEO : यालाच म्हणतात स्वतःच्या पायावर कुह्राड मारणे! श्रेयस देखील राहुल, पांड्याच्या पंक्तीत

Shreyas Iyer Hit Wicket : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 191 धावा केल्या. यात सूर्यकुमार यादवच्या 51 चेंडूत केलेल्या नाबाद 111 धावांचा मोलाचा वाटा होता. त्याला साथ देणाऱ्या भारताच्या इतर फलंदाजांना फार मोठी मजल मारता आली नाही. श्रेयस अय्यर 9 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. या 13 धावांच्या खेळीत अय्यरने एक चौकार आणि एक षटकार मारला. मात्र तो अनावधानाने झालेल्या स्वतःच्या चुकीमुळे बाद झाला. तो लॉकी फिर्ग्युसनचा चेंडू बॅटफूटवर खेळण्याच्या नादात क्रिजमध्ये खूपच आत गेला आणि त्याचा पाय विकेट्सला लागल्याने तो धावबाद झाला.

हेही वाचा: IND vs NZ : सुर्यकुमार यादवचा 360° जलवा! ट्वीटरवर मीम्सने केला कहर

ज्यावेळी श्रेयस अय्यर बाद झाला त्यावेळी अय्यरला हे माहिती नव्हते की त्याचा पाय विकेट्सला लागला आहे. ज्यावेळी प्रतिस्पर्धी संघ जल्लोष करू लागला त्यावेळी त्याला समजले की आपण हिट विकेट झालो आहोत. अय्यर निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. विशेष म्हणजे अय्यर हा टी 20 क्रिकेटमध्ये हिटविकेट होणारा 25 वा फलंदाज ठरला. तर भारताचा टी 20 मध्ये हिट विकेट होणारा चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी हर्षल पटले, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या टी 20 मध्ये हिट विकेट झाले होते.

हेही वाचा: Hardik Pandya : 'कॅप्टन' हार्दिकने स्वतः गोलंदाजी न करण्याचं सांगितलं कारण, म्हणाला...

हार्दिक पांड्या नुकत्याच झालेल्या टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडविरूद्धच्या सेमी फायनल सामन्यात डावाच्या शेवटच्या चेंडूवर हिट विकेट झाला होता. तर केएल राहुल टी 20 क्रिकेटमध्ये हिट विकेट होणारा भारताचा पहिला फलंदाज आहे. तो 2018 मध्ये श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात जीवन मेंडिसच्या गोलंदाजीवर हिट विकेट झाला होता. त्यानंतर हर्षल पटेल न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर हिट विकेट झाला होता.