Sri Lanka Cricket Team: लंकेचे स्वप्न भंगले! वर्ल्डकप 2023 साठी नाही झाला पात्र; जाणून घ्या आता कशी मिळेल संधी

Sri Lanka Cricket Team News: श्रीलंकेच्या संघाला भारतात होणाऱ्या आगामी आयसीसी वर्ल्डकप २०२३ आधी मोठा धक्का बसला आहे.
shri lanka fail to qualify directly into icc cricket world cup 2023 know how will shri lanka qualifies now
shri lanka fail to qualify directly into icc cricket world cup 2023 know how will shri lanka qualifies now

Sri Lanka Cricket Team: श्रीलंकेच्या संघाला भारतात होणाऱ्या आगामी आयसीसी वर्ल्डकप २०२३ आधी मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचा संघ वर्ल्डकपसाठी क्वालीफाय होऊ शकलेला नाहीये. श्रीलंकेच्या संघाने न्युझीलँड विरोधातीत एकदिवसीय सामना २-० ने गमावला तर एक सामना पावसामुळे रद्द झाला.

या पराभवासोबतच टीमचे वर्ल्डकपमध्ये थेट क्वालीफाय करण्याचं स्वप्न धुळीत मिळालं. मात्र अजूनही श्रीलंकेकडे वर्ल्डकप खेळण्याची संधी आहे. (Latest Marathi News)

न्युझीलँड आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे सीरीज आयसीसी वर्ल्डकप २०२३ सुपर लीग अंतर्गत खेळण्यात आली होती, ही दोन्ही देशांमधील अखेरची सुपर लीग होती. न्युझीलँडचा संघाने यापूर्वीच वर्ल्डकपसाठी क्वालीफाय केलं आहे. (Marathi Tajya Batmya)

मात्र श्रीलंकेकडे हा सामना जींकून थेट क्वालीफाय करण्याची संधी होती, मात्र लंकेने ती संधी गमावली. सीरजमधील तीनही सामने श्रीलंकेने गमावले. तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा संघ ६ विकेट्सनी पराभूत झाला.

हेही वाचा- जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

shri lanka fail to qualify directly into icc cricket world cup 2023 know how will shri lanka qualifies now
IPL 2023 : आयपीएल महोत्सव आजपासून! १० संघ, ५२ दिवस आणि ७० सामन्यांची साग्रसंगीत मेजवानी

वर्ल्डकपमध्ये २०२३ एकूण १० संघ खेळणार आहेत आणि या स्पर्धेत ७ संघ आतापर्यंत क्वालीफाय झाले आहेत. वर्डकप २०२३ सुपर लीग अंतर्गत गुणांमध्ये टॉप ८ संघांना क्वालीफाय करण्याची संधी होती. श्रीलंकेचा संघ ३१ मार्च २०२३ मध्ये संपलेल्या या राउंडनंतर गुणतालिकेत ९ व्या स्थानावर राहिला आहे.

shri lanka fail to qualify directly into icc cricket world cup 2023 know how will shri lanka qualifies now
IPL 2023: IPLचा पहिला सामना रद्द? गुजरात विरुद्ध चेन्नई सामन्यावर काळे ढग

त्यामुळे श्रीलंकेचा संघ थेच क्वालीफाय करु शकला नाही, मात्र टीम क्वालीफायर्सच्या माध्यामतून स्पर्धेसाठी क्वालीफाय करु शकते. हे क्वालीफायर्स जून २०२३ मध्ये खेळले जातील. तसचे शेवटच्या स्थानासाठी वेस्ट इंडीज आणि साऊथ आफ्रिका यांनी सर्व सामने खेळले आहेत, मात्र साऊथ आफ्रिकेचे दोन सामने अद्याप बाकी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com