Shubman Gill Fitness Update
esakal
भारताचा टी-२० संघाचा उपकर्णधार शुभमन गिलच्या तंदुरुस्तीचे मूल्यांकन सोमवारपासून बंगळूरमधील सेंटर ऑफ एक्सिलन्समध्ये सुरू झाले आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये येत्या ९ डिसेंबरपासून पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत असून, या मालिकेसाठी तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न या वेळी असणार आहे. सध्या तरी शुभमन गिल याच्या पुनरागमनाचे संकेत ५० टक्के आहेत.